S M L

हिंदुत्ववादी वैभव राऊत यांची अटक म्हणजे 'मालेगाव पार्ट २' !

नालासोपाऱ्यात देशी बॉम्ब सापडल्याप्रकरणी अटक करण्यात आलेला वैभव राऊत हा सनातन संघटनेचा कार्यकर्ता असल्याचा आरोप होतोय.

Updated On: Aug 10, 2018 12:07 PM IST

हिंदुत्ववादी वैभव राऊत यांची अटक म्हणजे 'मालेगाव पार्ट २' !

पालघर, 10 ऑगस्ट : नालासोपाऱ्यात देशी बॉम्ब सापडल्याप्रकरणी अटक करण्यात आलेला वैभव राऊत हा सनातन संघटनेचा कार्यकर्ता असल्याचा आरोप होतोय. पण हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांना नाहक त्रास देणे, खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवणे यांसारख्या घटना आता नवीन नाहीत. मालेगाव बॉम्बस्फोट आणि विवेकवादी विचारवंतांच्या हत्येचे कटही या संघटनेच्या साधकांवन झालेत. त्यामुळे वैभव राऊत यांची अटक ही मालेगाव पार्ट २ आहे कि काय अशी शंका आहे, असं हिंदु जनजागृती समितीचे राज्य संघटक सुनील घनवट यांनी म्हटलं आहे.

काल रात्री मुंबईतील नालासोपारा येथून वैभव राऊत यांना अटक झाल्याच्या बातम्या येत आहेत. ते सनातन संस्थेचे साधक असल्याचेही बातम्यांमध्ये उल्लेख येत आहेत. वैभव राऊत हे एक धडाडीचे गोरक्षक असून ते हिंदु गोवंश रक्षा समिती या गोरक्षण करणाऱ्या संघटनेच्या माध्यमातून कार्यरत होते. ते हिंदु जनजागृती समितीच्या सर्व हिन्दू संघटनांच्या एकत्रीकरणातून केल्या जाणार्‍या हिंदुसंघटनाच्या उपक्रमांमध्ये, तसेच आंदोलनांमध्ये सहभागी व्हायचे. मात्र गेल्या काही महिन्यांपासून त्यांचा कोणत्याही उपक्रमात सहभाग नव्हता, असंही सुनील घनवट यांनी म्हटलं आहे.

सनातन साधकाच्या घरी सापडला बॉम्ब साठा, एटीएसची मोठी धाड

दरम्यान, नालासोपाऱ्यात एटीएसने एका संशयित घरात छापा टाकून तब्बल 8 देशी बॉम्ब हस्तगत केलेत. भांडार आळीत राहणाऱ्या वैभव राऊत यांच्या घरी गुरवारी रात्री ATS ने ही धडक कारवाई केलीय, आरोपी वैभव राऊतच्या घरापासून काही अंतरावरच एका दुकानात बॉम्ब बनवण्याची सामग्री मोठ्या प्रमाणात जप्त करण्यात आली. त्यात गन पावडर, डिटोनेटर अशा घातक स्फोटकांचा समावेश आहे. या सामग्रीतून किमान दोन डझन बॉम बनवता येऊ शकतील.

एटीएसची टीम गेल्या काही दिवसापासून राऊतच्या घरावर पाळत ठेऊन होते आणि अखेर संशय बळावताच त्याच्या घरी धाड टाकण्यात आलीय. आरोपी वैभव राऊत हा एका कट्टर हिंदुत्ववादी संघटनेचा कार्यकर्ता असल्याचं सांगितलं जातंय, याच संघटनेच्या कार्यकर्त्यांवर विवेकवादी विचारवंताच्या हत्यांचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यामुळेच वैभव राऊतच्या अटकेमुळे मोठी खळबळ उडालीय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 10, 2018 12:07 PM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close