नालासोपारा स्फोटकं प्रकरणात आणखी एकजण ताब्यात

नालासोपारा स्फोटकं प्रकरणात आणखी एकजण ताब्यात

नालासोपारा स्फोटकं प्रकरणात आणखी एकाला ताब्यात घेण्यात आलं आहे.

  • Share this:

पालघर, 10 ऑगस्ट : नालासोपारा स्फोटकं प्रकरणात आणखी एकाला ताब्यात घेण्यात आलं आहे. पालघर जिल्ह्यातील नालासोपारा पश्चिमेकडील भंडारआळी परिसरात वैभव राऊत यांच्या बंगल्यात एटीएसच्या पथकाने छापा मारला. वैभव राऊतच्या घरात 8 देशी बॉम्ब सापडले आहेत. यात संशयित आरोपी वैभव राऊतला एटीएसने ताब्यात घेतलं आणि त्याच्या चौकशीनंतर आता आणखी एका संशयीताला ताब्यात घेण्यात आलं आहे. एटीएसने या दुसऱ्या संशयीताला पुण्यातून ताब्यात घेतलं आहे.

विक्रोळी एटीएस कार्यालयात वैभव राऊतची चौकशी सुरू आहे. वैभव राऊत आणि नवीन संशयीतांची समोरासमोर बसून कसून चौकशी करण्यात येत आहे. त्यामुळे या प्रकरणात आणखी काही खुलासे समोर येण्याची शक्यता आहे.

वैभव राऊत यांच्या घरातून ८ देशी बॉम्ब जप्त करण्यात आले आहेत. त्याच्या घरापासून काही अंतरावर असलेल्या एका दुकानात बॉम्ब बनवण्याची सामुग्री मोठ्या प्रमाणात जप्त करण्यात आली. सांगण्यात येत आहे की, ही सामग्री गन पावडर आणि डिटोनेटर असून त्यांच्यापासून दोन डझन हून अधिक बॉम्ब बनविण्यात येऊ शकतील.

वैभव राऊत याने ही विस्पोटके का आणि कशी जमा केली याचा आता एटीएस कसून तपास करत आहे. विशेष म्हणजे सामग्री सापडल्याने या घटनेची तीव्रता अधिक वाढली आहे. वैभव हा सनातनी विचारधारेचा असून कुठे घातपात करणार होता का याबाबत अजून कोणतीही माहिती मिळाली नाही. पण एटीएसची टीम गेल्या काही दिवसापासून सतत पाळत ठेऊन होती. आणि शेवटी गुरवारी रात्री त्याच्या घरी धाड टाकून त्याला ताब्यात घेण्यात आलं आहे. डॉग स्कोड आणि फॉरेन्सिक टीम सुद्धा घटनास्थळी उपस्थित आहे. वैभव राऊत हा कट्टर हिंदुत्ववादी संघटनेचा कार्यकर्ता आहे.

First published: August 10, 2018, 2:43 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading