• Home
 • »
 • News
 • »
 • news
 • »
 • पुढचे 5 दिवस या राज्यांसाठी धोक्याचे, हवामान खात्याने दिली महत्त्वाची माहिती

पुढचे 5 दिवस या राज्यांसाठी धोक्याचे, हवामान खात्याने दिली महत्त्वाची माहिती

17 मेपासून पावसाळ्यासंदर्भात कोणताही बदल झालेला नाही. अशा परिस्थितीत मान्सूनला केरळ गाठायला अधिक वेळ लागू शकतो.

 • Share this:
  नवी दिल्ली, 26 मे : ओडिशा (Odisha) आणि पश्चिम बंगाल (West Bengal) इथं काही दिवसांपूर्वी आलेल्या सुपर चक्रीवादळ अम्फाननं (Cyclone Amphan)पावसाळ्याच्या वेगाला ब्रेक लावला आहे. भारतीय हवामान खात्याच्या (Indian Meteorological Department)म्हणण्यानुसार, 17 मेपासून पावसाळ्यासंदर्भात कोणताही बदल झालेला नाही. अशा परिस्थितीत मान्सूनला केरळ गाठायला अधिक वेळ लागू शकतो. मान्सूनच्या उदासिनतेमुळे देशात तापमान (Temperature) वेगानं वाढत आहे. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, पुढच्या काही दिवसांमध्ये उन्हाचा तडाखा जबरदस्त वाढणार आहे. उत्तर भारतातील बर्‍याच भागांत 29-30 मे रोजी धुळीच्या वादळाची शक्यता आहे. ज्यामुळे उन्हाचा प्रादुर्भाव दूर होऊ शकतो.\ कोरोना रुग्ण वाऱ्यावर तर कर्मचारी आंदोलनावर, मुंबईतल्या केईएममधला गंभीर प्रकार भारतीय हवामानशास्त्र विभागानं (IMD) रविवारी 25-26 मे दरम्यान उत्तर भारतासाठी रेड अलर्ट जारी केला आहे. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, गेल्या काही वर्षात मान्सूनची स्थिती पाहिल्यास मेच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत मान्सून श्रीलंकेपासून ते म्यानमारपर्यंत पोहोचलेला असतो. पण यावेळी त्याची काहीही चिन्ह दिसत नाहीयेत. यंदा पावसाळा उशीरा दाखल होणार असल्यामुळे यावेळी केरळमध्ये मान्सून उशीर दाखल होईल असं याआधीच हवामान खात्याने स्पष्ट केलं होतं. केरळमध्ये मान्सून दरवर्षी जूनला येतो. परंतु यावेळी तो 5 जूनपर्यंत केरळमध्ये पोहोचण्याची शक्यता आहे. आईनं सासूला फसवण्यासाठी लेकराचा दिला बळी, 3 महिन्याच्या बाळाला संपवलं आणि... या राज्यांना उष्णतेचा सर्वाधिक धोका येत्या पाच दिवसांत पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, विदर्भ आणि तेलंगणाच्या काही भागांमध्ये कडक उष्णतेचा तडाखा असणार आहे. छत्तीसगड, ओडिशा, गुजरात, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भ, किनारपट्टी आंध्र प्रदेश, यानम, रायलसीमा आणि उत्तर आतील कर्नाटकातील वेगळ्या भागातही उष्णतेची लाट येऊ शकते. मातोश्रीवर शरद पवारांसोबत झाली गुप्त बैठक, महाराष्ट्रात होणार राजकीय भूकंप? दिल्ली, राजस्थान, हरियाणा, पंजाब आणि उत्तर प्रदेशच्या काही भागात गेल्या काही दिवसांपासून जोरदार उष्णता पसरली आहे आणि काही ठिकाणी तापमान 45 डिग्री सेल्सिअसपर्यंत जात आहे. राजस्थानातील चूरू इथे सोमवारी दिवसाचे सर्वाधिक तापमान 47.5 डिग्री सेल्सिअस, तर उत्तर प्रदेशात अलाहाबाद सर्वात उष्ण तापमान होते जेथे तापमान 46.3 डिग्री सेल्सियस होते. कसा रचला होता पुलवामा हल्ल्याचा कट, समोर आला आतापर्यंतचा सगळ्या मोठा खुलासा संपादन - रेणुका धायबर
  Published by:Manoj Khandekar
  First published: