कसा रचला होता पुलवामा हल्ल्याचा कट, समोर आला आतापर्यंतचा सगळ्या मोठा खुलासा

कसा रचला होता पुलवामा हल्ल्याचा कट, समोर आला आतापर्यंतचा सगळ्या मोठा खुलासा

पुलवामा हल्ल्यासंदर्भात तब्बल एक वर्षानंतर धक्कादायक खुलासा समोर आला आहे. दहशतवाद्यांनी हा स्फोट कसा घडवला आणि हा ट्रक कसा आला हे उघड झालं आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 26 मे : जम्मू-काश्मीरच्या (Jammu and Kashmir) पुलवामा (Pulwama) इथं 14 फेब्रुवारी 2019 रोजी झालेल्या दहशतवादी हल्ला (Terrorist Attack) देश अजूनही विसरला नाही. स्फोटकांनी भरलेल्या वाहनाची सीआरपीएफ ट्रकला धडक बसली. त्यात सीआरपीएफचे (CRPF) 40 जवान शहीद झाले. या घटनेला आता एक वर्ष उलटलं आहे, पण अजूनही ही बातमी प्रत्येक नागरिकाच्या जीवाला घर करते. पण या हल्ल्यासंदर्भात तब्बल एक वर्षानंतर धक्कादायक खुलासा समोर आला आहे. दहशतवाद्यांनी हा स्फोट कसा घडवला आणि हा ट्रक कसा आला हे उघड झालं आहे. या हल्ल्यात वापरल्या गेलेल्या तोफखान्याचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांनी यासंबंधी माहिती उघड केली आहे.

दहशतवाद्यांनी संपूर्ण नियोजन करून रचला होता कट

हिंदुस्तान टाईम्समध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, अधिकाऱ्यांनी संपूर्ण घटनेचा खुलासा केला आणि सांगितलं की दहशतवाद्यांनी बॉम्ब बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या वस्तूंची चोरी केली होती. मोठा हल्ला करण्यासाठी दहशतवाद्यांनी दगडांच्या ढिगाऱ्यामधून सुमारे 500 जिलेटिन कांड्या चोरी केल्या होत्या. यासह त्यांनी जवळच्या दुकानातून अमोनियम नायट्रेट आणि अमोनियम पावडर कमी प्रमाणात विकत घेतली होती, जेणेकरून कोणालाही शंका येऊ नये. इतकंच नाही तर, आरडीएक्स पाकिस्तानकडून बऱ्याच वेळा थोड्या-थोड्या प्रमाणात मागवलं गेलं.

मातोश्रीवर शरद पवारांसोबत झाली गुप्त बैठक, महाराष्ट्रात होणार राजकीय भूकंप?

पुलवामा हल्ल्यासाठी स्फोटक साहित्य कशी मिळवली गेली यासंबंधी माहिती देताना एका बंडखोर अधिकाऱ्याने सांगितले की, जैश-ए-मोहम्मद कमांडर मुदस्सीर अहमद खान (11 मार्च, 2019 रोजी पिंग्लिशमध्ये झालेल्या चकमकीत मारला गेला), इस्माईल भाई उर्फ ​​लंबू (सध्या काश्मीरमधील मुख्य जेएम कमांडर), समीर अहमद डार (घाटीतील जैशचा दुसरा सेनापती) आणि शकीर बशीर मगरे (28 फेब्रुवारी, 2020 रोजी राष्ट्रीय अन्वेषण एजन्सीने अटक केली)यांनी खेव (पुलवामा), खुन्नम (श्रीनगर) , त्राल, अवंतीपोरा आणि लेथपोरा भागात हळू हळू रॉक ब्रेकिंग कंपनीत वापरण्यात येणाऱ्या जिलेटिनच्या कांड्या चोरल्या.

सरकार अस्थिर झालंय का? पवारांसोबतच्या गुप्त बैठकीवर संजय राऊतांचा मोठा खुलासा

संपूर्ण प्लान करू गोळा केल्या वस्तू

जिलेटिनच्या कांड्या, ज्यामध्ये नायट्रोग्लिसरीन असतं, ते गुप्तचर संस्थांकडून संरक्षण देण्यासाठी 5 किलो आणि 10 किलोच्या प्रमाणात गोळा केलं गेलं होतं. मिळालेल्या माहितीनुसार, अमोनियम नायट्रेट (सुमारे 70 किलो) आणि अमोनियम पावडर स्थानिक बाजारपेठेतून खरेदी करण्यात आली तर 35 किलो आरडीएक्स पाकिस्तानातून आणलं गेलं.

कोरोनाचा गेल्या 24 तासांत पुन्हा हाहाकार, मृतांची संख्याही 4167 वर

पाकिस्तानकडून थोड्या-थोड्या प्रमाणात मागवलं आरडीएक्स

या प्रकरणाचा तपास करणाऱ्या फॉरेन्सिक तज्ञांनी हल्ल्यात अमोनियम नायट्रेट, नायट्रोग्लिसरीन आणि आरडीएक्सचा वापर केल्याची पुष्टी आधीच केली होती. गृह मंत्रालयाच्या (एमएचए) वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, एनआयएने हल्ल्यानंतर लगेचच सर्व पुरावे एकत्र केले होते. हे स्फोटक साहित्य कसं गोळा केलं आणि यामागे कोण होतं याची माहिती मिळाली. ते म्हणाले की, आरडीएक्स फारच थोड्या प्रमाणात पाकिस्तानातून भारतात पाठवण्यात आलं. तर या हल्ल्यासाठी जैशचे दहशतवादी गुप्तपणे भारतात घुसले होते असंही सांगण्यात येत आहे.

यापूर्वीही घडल्या आहेत चोरीच्या घटना

जिलेटिनच्या कांड्या अशा कुठेही उघड्यावर मिळत नाहीत. या कांड्या सरकारने बऱ्याच कंपन्या किंवा सरकारी विभागांना दिल्या आहेत.परंतु पूर्वीच्या तपासणीत असं आढळलं की, पर्वत आणि खडकं नष्ट करण्यासाठी खाणींमध्ये वापरण्यात येणारी स्फोटकं गुन्हेगार आणि दहशतवाद्यांच्या हाती लागली आणि त्यातून त्यांनी पुढचा कट रचला. गाठले आहेत.

महाराष्ट्रात महासंकट, राज्याची तुलना देशाशी केली असता धक्कादायक आकडेवारी समोर

संपादन - रेणुका धायबर

First published: May 26, 2020, 10:52 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading