जालना, 26 मे : कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी देशात लॉकडाऊनचा चौथा टप्पा अवलंबण्यात आला आहे. या लॉकडाऊनदरम्यान, हत्येच्या अनेक धक्कादायक घटना समोर आल्या. असाच एक मनाला सुन्न करणारा प्रकार समोर आला आहे. जन्मदात्या आईनेच 3 महिन्याच्या चिमुकल्याचा खून केल्याची घटना उघकीस आली आहे. यामुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली असून आई नावाला कलंक लावणारी ही घटना आहे. एका तीन महिन्याच्या चिमुकल्याला घरासमोरील पाण्याच्या टाकीत टाकून जीवे मारल्याच्या प्रकरणाचं नवीन वळण समोर आलं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सासूचा काटा काढण्यासाठी जन्मदात्या आईनेच आपल्या पोटच्या मुलाचा निर्घृण खून केला. आईच्या या अशा वागण्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप पसरला आहे. खरंतर आई या शब्दात प्रेमाचा सागर असतो असं म्हणतात. पण अशा घटना या शब्दाला काळीमा फासणाऱ्या आहेत. कसा रचला होता पुलवामा हल्ल्याचा कट, समोर आला आतापर्यंतचा सगळ्या मोठा खुलासा अंबड शहरातील आंबेडकर नगर भागात राहणाऱ्या पायल आणि विजय जाधव या दाम्पत्याचा 3 महिन्याचा चिमुकला काल पहाटे घरासमोरील पाण्याच्या टाकीत मृतावस्थेत आढळून आला होता. कोणीतरी अज्ञात आरोपीने झोळीतील चिमुकल्यास पाण्याच्या टाकीत टाकून खून केला असल्याचा संशयावरून अंबड पोलीसात अज्ञात आरोपी विरूद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, तपासाची चक्रे फिरवत अंबड पोलिसांनी अवघ्या सहा तासांत या चिमुकल्याचा खुनाचा तपास लावला. मातोश्रीवर शरद पवारांसोबत झाली गुप्त बैठक, महाराष्ट्रात होणार राजकीय भूकंप? फिर्यादी जन्मदाती आई पायल विजय जाधव हिनेच आपल्या पोटच्या लेकराला पाण्याच्या टाकीत टाकून जिवे ठार मारल्याचं पोलीस तपासात उघडकीस आलं. पायल हिचा विजय जाधवसह आंतरजातीय प्रेम विवाह झालेला असून सासुसोबत तिचं पटत नव्हतं. सासूला अडकवून तिचा काटा काढण्यासाठी आपल्या चिमुकल्याचा जीव घेतल्याचं पायलनं कबूल केलं आहे. पोलिसांनी या क्रूरकर्मा आईला अटक करून बेड्या ठोकल्या. सरकार अस्थिर झालंय का? पवारांसोबतच्या गुप्त बैठकीवर संजय राऊतांचा मोठा खुलासा संपादन - रेणुका धायबर
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.