Home /News /news /

वाधवान कुटुंबीयांना सीबीआयकडे सोपवणार, अनिल देशमुख यांनी केलं जाहीर

वाधवान कुटुंबीयांना सीबीआयकडे सोपवणार, अनिल देशमुख यांनी केलं जाहीर

'अशाही परिस्थितीत काही लोकांचं 'मुंगेरी लाल के हसीन सपने' असं काही सुरू आहे. त्यामुळे सहकार्य करा, राजकारण करू नका'

    मुंबई, 22 एप्रिल : कोरोना व्हायरसमुळे देशभरात लॉकडाउन करण्यात आलं आहे. राज्यातली संचारबंदी लागू करण्यात आली असताना वाधवान कुटुंबीयांनी महाबळेश्वर गाठले होते. या प्रकरणी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी हे प्रकरण आता ईडी आणि सीबीआयकडे सोपवणार असल्याची माहिती दिली आहे. अनिल देशमुख यांनी फेसबुकवर लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पालघर आणि राज्यातील वाधवान प्रकरणावर भाष्य केलं. वाधवान कुटुंबीयांना होम क्वारंटाइन करण्यात आले होते. त्यांचा आज क्वारंटाइनचा कार्यकाळ संपत आहे. त्यामुळे या प्रकरणाची अधिक चौकशी करण्यासाठी ईडी आणि सीबीआयला त ताब्यात घेण्याची सूचना केली आहे. सीबीआयने वाधवान कुटुंबांची संपूर्ण चौकशी करुन सत्य परिस्थितीत समोर आणावी, असं देशमुख यांनी स्पष्ट केलं आहे. हेही वाचा - कोरोनाच्या भीतीने मुलाने नाकारला बापाचा मृतदेह, तहसिलदारांनी केले अंत्यसंस्कार पालघरमध्ये दोन साधू आणि त्यांच्या चालकाची ही अफवेतून हत्या करण्यात आली. हे साधू संचारबंदीत गुजरातला चालले होते. पण, पुढे त्यांना जाता आले नाही. त्यामुळे परतत असताना गावकऱ्यांनी चोर समजून त्यांच्यावर हल्ला केला यात त्यांचा मृत्यू झाला. ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. या प्रकरणी 101 लोकांना अटक करण्यात आली असून यात कुणीही मुस्लीम व्यक्ती नाही. या प्रकरणाचा तपास हा CID कडे देण्यात आला आहे, अशी माहितीही देशमुख यांनी केली. पालघर प्रकरणाला काही लोकांनी जातीचा आणि धर्माचा रंग देण्याचा प्रयत्न केला. घटना घडली तेव्हा काही लोकं ओय बस कर असं म्हणत होते पण काही लोकांनी शोएब असा त्याचा अर्थ काढून अनर्थ घडवला. हा प्रकार अत्यंत चुकीचा आहे, असं मतही त्यांनी व्यक्त केलं. हेही वाचा - गोव्याने असं केलं तरी काय? ज्यामुळे ठरलं कोरोनामुक्त होणारं देशातलं पहिलं राज्य राज्यासमोर कोरोनाचे मोठे संकट उभे ठाकले आहे. अशा परिस्थितीत सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे. पण, अशाही परिस्थितीत काही  लोकांचं 'मुंगेरी लाल के हसीन सपने' असं काही सुरू आहे. त्यामुळे सहकार्य करा, राजकारण करू नका, असा टोला त्यांनी भाजपला लगावला. संपादन - सचिन साळवे
    Published by:sachin Salve
    First published:

    Tags: Anil deshmukh

    पुढील बातम्या