Home /News /national /

पोटच्या पोराने कोरोनाच्या भीतीने बापाचा मृतदेह स्वीकारला नाही, मुलगा म्हणून पुढे आले तहसिलदार आणि...

पोटच्या पोराने कोरोनाच्या भीतीने बापाचा मृतदेह स्वीकारला नाही, मुलगा म्हणून पुढे आले तहसिलदार आणि...

शुजालपूर इथल्या प्रेम सिंग मेवाडा यांना कोरोना झाला होता. त्यांचा दोन दिवसांपूर्वी मृत्यू झाला.

शुजालपूर इथल्या प्रेम सिंग मेवाडा यांना कोरोना झाला होता. त्यांचा दोन दिवसांपूर्वी मृत्यू झाला.

एकुलत्या एक मुलाने लिहून दिलं की,'वडिलांचा मृतदेह प्रशासनाला देतो. त्यांनीच अंत्यसंस्कार करावेत. मला किट घालता किंवा काढता येत नाही.'

    भोपाळ, 22 एप्रिल : कोरोनाने जगभरात दहशत निर्माण केली आहे. आतापर्यंत जगात 1 लाख 60 हजारांहून अधिक नागरिकांचा कोरोना व्हायरसमुळे मृत्यू झाला आहे. भारतातही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. दरम्यान, कोरोनाची धास्ती घेतल्यानं लोक आपल्या माणसांपासूनही अंतर ठेवत आहेत. मात्र इतकं की मुलानं बापाचा मृतदेह नाकारल्याची धक्कादायक घटना घडली आहे. वडिलांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्यानंतर आपल्यालाही तो होईल या भीतीने मुलाने अंत्यसंस्कार करण्यास नकार दिल्याची घटना मध्य प्रदेशात घडली. प्रशासनाने कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीवर त्याचे कुटुंबिय अंत्यसंस्कार करतील अशी तयारी केली होती. मात्र मुलाने वडिलांचा मृतदेह घेण्यास आणि अंत्यसंस्कार करण्यास नकार दिला. त्यावेळी शहराच्या तहसिलदारांनीच त्या बापाचा मुलगा म्हणून पुढे येत अंत्यसंस्कार केले. याबाबत मिळालेली माहिती अशी की, शुजालपुरचे रहिवासी प्रेम सिंग मेवाडा यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यांचा मृतदेह मुलगा संदीप मेवाडा यांने स्वीकारण्यास नकार दिला. इतकंच काय तर अंत्यसंस्कार करायलासुद्धा नाही म्हणाला. हे सर्व त्यानं लेखी स्वरुपात दिलं. बापाचा मृतदेह दोन दिवस अंत्यसंस्कारासाठी पडून असताना मुलाच्या या वागण्यामुळे तहसिदार गुलाब सिंग बघेल यांच्या डोळ्यात पाणी आलं. त्यांनी संदीप आणि इतर नातेवाईकांना समजालून सांगितलं की किट घालून अंत्यसंस्कार करा. प्रेम सिंग यांचा मुलगा संदीप मेवाडा आणि पत्नीसह इतर नातेवाईक दवाखान्यात आले होते. पण त्यांनी मृतदेह नेण्यास आणि अंत्यसंस्कार करण्यास नकार दिला. तहसिलदारांनी केलेल्या विनंतीनंतर मुलाने लिहून दिलं की, मला किट घालता येत नाही आणि काढताही येत नाही. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांवर अंत्यसंस्काराबद्दलची माहिती मला नाही. मी माझ्या वडिलांचा मृतदेह प्रशासनाकडे सोपवत आहे. त्यांनीच मृतदेहावर अंत्यसंस्कार करावेत. त्यानंतर बघेल यांनीच प्रेम सिंग यांच्यावर विधीवत अंत्यसंस्कार केले. हे वाचा : कोरोनाच्या रिपोर्टमध्ये एका चुकीमुळे नवजात बाळासह महिलेची सुरु आहे धडपड
    Published by:Suraj Yadav
    First published:

    Tags: Coronavirus

    पुढील बातम्या