सेना-भाजपच्या युतीचे थर कोसळणार, चंद्रकांत पाटलांनी दिले संकेत

सेना-भाजपच्या युतीचे थर कोसळणार, चंद्रकांत पाटलांनी दिले संकेत

भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी युतीसाठी 50-50 चा फॉर्म्युला अशक्य असल्याचं म्हटलं आहे. 135 -135 जागांमध्ये आमची ओढाताण होईल याची जाणीव शिवसेनेलाही असल्याचं पाटील यावेळी म्हणाले.

  • Share this:

नागपूर, 24 ऑगस्ट : लोकसभेनंतर आमचा युतीचा फॉर्म्युला ठरला आहे, असं सांगणारे भाजप-सेना नेते अद्यापही जागावाटपाबाबत एकमतावर नसल्याचं दिसत आहे. एकीकडे शिवसेना आणि भाजप युतीच्या आणाभाका घेत असताना दुसरीकडे भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी युतीसाठी 50-50 चा फॉर्म्युला अशक्य असल्याचं म्हटलं आहे. 135 -135 जागांमध्ये आमची ओढाताण होईल याची जाणीव शिवसेनेलाही असल्याचं पाटील यावेळी म्हणाले. नागपुरातील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

मित्रपक्षांच्या 18 जागा सोडून 288 जागांपैकी फिफ्टी-फिफ्टीच्या फॉर्म्युल्यानुसार शिवसेना आणि भाजपला प्रत्येकी 135 जागा मिळू शकतात. मात्र, आता भाजपनं नकारात्मक सूर आळवायला सुरुवात केल्यानं जागावाटपावरून युतीचं बिनसणार का? असा प्रश्न आता निर्माण होतो.

लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांनी युती केली. सेना-भाजप युती ही राज्यातली सर्वात जुनी युती असली तरी त्यामधले तणाव जगजाहीर आहेत. एवढंच काय महाराष्ट्र भाजप आणि केंद्रीय पातळीवरचा पक्ष यांच्यामध्येही किती जागा शिवसेनेला द्यायच्या याबाबत एकमत नाही. शिवसेनेला 288 पैकी फक्त एक तृतीयांश जागाच द्याव्यात अशी महाराष्ट्रातल्या भाजप नेत्यांची भूमिका आहे. अगदीच आग्रह झाला आणि केंद्राकडून हस्तक्षेप झाला, तर जास्तीत जास्त 100 जागा शिवसेनेसाठी सोडण्यास भाजप तयार आहे.

दुसरीकडे शिवसेना निम्म्या जागा मिळाल्या तरच युती या भूमिकेवर ठाम आहे. भाजप - सेनेत मोठा भाऊ कोण याविषयी खूप वेळा चर्चा झाली. पण आमचा फॉर्म्युला ठरला, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकत्रितपणे सांगितलं. पण जागावाटपाबद्दल दोन्ही पक्ष आपापला हट्ट सोडायला तयार नाहीत, अशी सूत्रांची माहिती आहे. त्यात आता चंद्रकांत पाटील यांच्या या वक्तव्यामुळे युतीमध्ये पुन्हा ठिणगी पडणार असं दिसतंय.

इतर बातम्या - BREAKING: दहीहंडी उत्सवाला गालबोट, पाचव्या थरावरून कोसळून गोविंदाचा मृत्यू

मागच्या वेळी भाजपने निवडणुकीच्या आधी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण याची घोषणा केली नव्हती. याही वेळी मुख्यमंत्रिपदी कोण याविषयी आधी चर्चा नको अशी शिवसेनेची भूमिका आहे. आदित्य ठाकरे यांचंही नाव मध्यंतरी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून पुढे येत होतं. उलट राज्यातले मुख्यमंत्र्यांच्या जवळचे नेते मात्र देवेंद्र फडणवीस यांच्या नावावरच निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत. मीच मुख्यमंत्री होणार, असं स्वतः फडणवीस यांनीदेखील जाहीरपणे म्हटलं आहे. त्यामुळे सेना- भाजप युतीचा पेच सुटण्याची चिन्हं नाहीत.

इतर बातम्या - मुंबईत मायेचा हात फिरवणाऱ्या बापानेच केला लेकीवर बलात्कार, रोज पाजायचा दारू

यातच शुक्रवारी (23 ऑगस्ट)उद्धव ठाकरे यांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन प्रधानमंत्री फसल योजनेवर जोरदार टीका केली. पीक विम्याचे पैसे लाटणाऱ्यांवर कारवाई करा, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी शेतकऱ्यांचा प्रश्न लावून धरला आहे. सरकारमध्ये असूनही सरकारला कारवाईची मागणी करणं, सरकारी योजनेवर टीका करणं हे शिवसेनेचं धोरण पाहता ही निवडणूकपूर्व तयारी असल्याचं बोललं जात आहे.

इतर बातम्या - खुनाच्या आरोपाखाली तारुण्य गेलं तुरुंगात, 21 वर्षांनी कोर्टानं ठरवलं निर्दोष

ही प्रधानमंत्री फसल योजना  विमा कंपनी बचाव योजना होऊ नये अशा शब्दांत त्यांनी टीका केली. शेतकऱ्यांचे 2 हजार कोटी रुपये विमा कंपन्यांकडे असल्याचे आणि आपण त्याचा पाठपुरावा करणार असल्याचंही उद्धव यांनी स्पष्ट केलं.

दहीहंडीसाठी लावलेला खांबच गोविंदावर कोसळला LIVE VIDEO

Published by: Renuka Dhaybar
First published: August 24, 2019, 8:31 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading