BREAKING: दहीहंडी उत्सवाला गालबोट, पाचव्या थरावरून कोसळून गोविंदाचा मृत्यू

BREAKING: दहीहंडी उत्सवाला गालबोट, पाचव्या थरावरून कोसळून गोविंदाचा मृत्यू

पाचव्या थरावरून कोसळून गोविंदाचा मृत्यू झाला आहे. अर्जुन खोत (वय 25) असं मृत गोविंदाचं नाव आहे.

  • Share this:

रायगड, 24 ऑगस्ट : रायगडमध्ये दहीहंडी उत्सवाला गालबोट लागलं आहे. दहीहंडी फोडताना एका गोविंदाचा मृत्यू झाल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. पाचव्या थरावरून कोसळून गोविंदाचा मृत्यू झाला आहे. अर्जुन खोत (वय 25) असं मृत गोविंदाचं नाव आहे. म्हसळा तालुक्यातील खरसई गावातील ही घटना आहे.

तर एकीकडे आज दिवसभर संपूर्ण राज्यात दहीहंडीच्या उत्सवाचा दणका पाहायला मिळाला. गोविंदा रे गोपाळाच्या गजरात राज्यभरात ठिकठिकाणी दहीहंडीचा उत्साह होता. मुंबईत दादर, ठाणे भागात उंचच-उंच दहीहंड्यांचा थरार सुरू आहे. दिवसभरातील दहीहंडीच्या थरारात 25 हून अधिक गोविंदा जखमी झाले आहेत. मुंबईतील तिन्ही पालिका आणि सरकारी हॉस्पिटल्स जखमी गोविंदावर उपचार करण्यासाठी सज्ज आहे.

केईएम हॉस्पिटलमध्ये संध्याकाळपर्यंत एकूण 20 जखमी गोविंदा दाखल झाले होते. तीन गोविंदांना हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी दाखल करून घेण्यात आलं आहे. गोविंदांमध्ये 14 वर्षाखालील गोविंदांचाही समावेश असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. तर जिगरबाज गोपाळ आणि गोपिका आकाशाला गवसणी घालत दहीहंडी फोडण्यासाठी आणि सलामी देण्यासाठी पराकाष्ठा सुरू आहे. थरांचा थरथराट बघण्यासाठी मोठी गर्दी केली जात आहे. ठाण्यात जय जवान पथकाने 9 थर रचले आहेत. 9 थर रचत जय जवान पथकाने दिमाखदार सलामी दिली आहे.

दरम्यान, देशाचे माजी केंद्रीय अर्थमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अरुण जेटली यांचं शनिवारी (24 ऑगस्ट) निधन झालं. त्यामुळे सामाजिक भान राखत मुंबईसह अनेक ठिकाणी दहीहंडी रद्द करण्यात आली आहे. ठाण्यात दहीहंडी आयोजकांनी कार्यक्रम रद्द केले आहेत. ठाण्यात स्वामी प्रतिष्ठानने, संस्कृती प्रतिष्ठानने रंगारंग कार्यक्रम आणि डीजे बंद केला. प्रताप सरवाईक यांची दहीहंडीदेखील रद्द करण्यात आली आहे.

इतर बातम्या - खुनाच्या आरोपाखाली तारुण्य गेलं तुरुंगात, 21 वर्षांनी कोर्टानं ठरवलं निर्दोष

मुंबईत मायेचा हात फिरवणाऱ्या बापानेच केला लेकीवर बलात्कार, रोज पाजायचा दारू

काय आहे Soft tissue sarcoma ज्याच्याशी अरुण जेटलींची झुंज अपयशी ठरली?

भाजपचे मोठे नेते आणि माजी अर्थमंत्री अरुण जेटली Arun jaitely यांचं शनिवारी दुपारी दिल्लीत निधन झालं. दिल्लीच्या AIIMS रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. जेटली गेले अनेक दिवस आजारी होते. शेवटचे  काही दिवस त्यांना जीवनरक्षक यंत्रणेवर त्यांना ठेवलं होतं. त्यांची मूत्रपिंड खराब झाली होती आणि ते डायलिसीसवर होते. त्यानंतर गेल्या मे महिन्यात त्यांची किडनी ट्रान्सप्लांट करण्यात आली होती.  पण त्या वेळी  त्यांना आणखी एक दुर्मीळ आजार झाल्याचं गेल्या वर्षी लक्षात आलं. त्यांच्या डाव्या पायाला एक दुर्मीळ कर्करोग झाला होता. या रेअर कॅन्सरचं नाव सॉफ्ट टिश्यू सारकोमा Soft tissue sarcoma असं आहे.

Soft tissue sarcoma म्हणजे काय?

सॉफ्ट टिश्यू सारकोमा हा एक दुर्मीळ प्रकारचा कर्करोग आहे. जगात हा कर्करोग झालेली फार कमी माणसं आहेत. त्यामुळे अर्थातच याचा खात्रीशीर इलाज अद्याप समोर आला नाही.

जेटलींनी या आजारावर अमेरिकेत जाऊनदेखील उपचार करून घेतले होते. पण अखेर त्यांची झुंज अपयशी ठरली. शनिवारी 24 ऑगस्ट त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

दहीहंडीसाठी लावलेला खांबच गोविंदावर कोसळला LIVE VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 24, 2019 07:32 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading