ठाणे, 24 ऑगस्ट : बापलेकीच्या नात्याला कलंक लावणारी एक धक्कादायक घटना नवी मुंबईमध्ये घडली आहे. सावत्र वडिलांनी अनेक वर्ष मुलीवर बलात्कार केला आणि तिच्यावर अत्याचार केल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. मुंबईसारख्या शहारमध्ये असे प्रकार होत असल्याने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. वडिलांच्या मायेचा हात डोक्यावरून फिरण्याएवजी पित्याकडूनच शारीरिक शोषण झाल्यामुळे पीडित तरुणीला मानसिक धक्का बसला आहे. एका किशोरवयीन सावत्र मुलीवर बलात्कार केल्याबद्दल एका व्यक्तीला 10 वर्षांची तुरूंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. ठाणे कोर्टाने गुरूवारी आयपीसी आणि बाल संरक्षण लैंगिक अपराध संरक्षण (पॉक्सो) कायद्यातील संबंधित कलमांखाली या व्यक्तीला दोषी ठरवलं आहे. विशेष न्यायाधीश (पोक्सो) कविता डी. शिरभाते यांनी नवी मुंबईतील वाशी इथे राहणाऱ्या 37 वर्षीय आरोपीला 4,000 रुपयांचा दंडही ठोठावला आहे. ‘प्रियकराने नाही वडिलांनी केला माझ्यावर बलात्कार’ सुरुवातीला बलात्काराच्या या प्रकरणामध्ये पीडितेचा प्रियकर हा दोषी होता. त्याच्याविरोधात कोर्टामध्ये खटला सुरू होता. पण पीडितेने खुलासा केल्याप्रमाणे प्रियकराने नाही तर तिच्य़ा वडिलांनी बलात्कार केल्याची माहिती समोर आली आहे. पीडितेच्या साक्षीनंतर प्रियकराची निर्दोष मुक्तता करण्यात आली असून वडिलांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. पीडित मुलीच्या सावत्र पित्याने तिच्यावर घरात आणि अनेक ठिकाणी बलात्कार केला आहे. इतर बातम्या - खुनाच्या आरोपाखाली तारुण्य गेलं तुरुंगात, 21 वर्षांनी कोर्टानं ठरवलं निर्दोष वडिलांनी मुलीला दारू पाजली आणि केला बलात्कार सहायक सरकारी वकील विनीत कुलकर्णी यांच्या म्हणण्यानुसार, 2011पासून सावत्र वडिल मुलीवर बलात्कार करत होता. 2014 पर्यंत त्याने तिच्यावर लैंगिक छळ सुरूच ठेवले. तिच्यावर बलात्कार करण्याआधी वडिल तिला दारू पाजत असे अशी माहितीही पोलिसांकडून देण्यात आली आहे. इतर बातम्या - जेव्हा दाम्पत्याने PORN साईटवर पाहिला त्यांचाच अश्लील VIDEO आणि नंतर…! आरोपी वडिलांना खोटी तक्रार दाखल करण्यास पाडलं भाग कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीनुसार, दरम्यानच्या काळात मुलीने आपल्या सावत्र वडिलांचे घर सोडलं होतं आणि ती फुटपाथवर राहत होती. तिथून तिला सुधारगृहात नेलं गेलं. ते म्हणाले की, आरोपी वडिलांनी प्रियकरविरूद्ध अपहरण आणि बलात्काराची खोटी तक्रार दाखल करण्यास भाग पाडलं होतं. डोंबिवलीत दहीहंडीसाठी लावलेला खांबच गोविंदावर कोसळला LIVE VIDEO
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.