मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /गुगलवरून नंबर घेऊन बैलासाठी मागितली मदत आणि...

गुगलवरून नंबर घेऊन बैलासाठी मागितली मदत आणि...

संकटात सापडलेल्या व्यक्तीनं मदतीसाठी गुगलवरून फोननंबर काढून मदत मागितली आणि पुन्हा एकदा स्वत:वर नवं संकट ओढवून घेतलं आहे.

संकटात सापडलेल्या व्यक्तीनं मदतीसाठी गुगलवरून फोननंबर काढून मदत मागितली आणि पुन्हा एकदा स्वत:वर नवं संकट ओढवून घेतलं आहे.

संकटात सापडलेल्या व्यक्तीनं मदतीसाठी गुगलवरून फोननंबर काढून मदत मागितली आणि पुन्हा एकदा स्वत:वर नवं संकट ओढवून घेतलं आहे.

गाझियाबाद, 26 जानेवारी: अडचणीत सापडल्यानंतर किंवा आपल्याला एखादी गोष्ट हवी असेल तर आपण ती शोधण्यासाठी इंटरनेटची मदत घेतो. मात्र बऱ्याचवेळा इंटरनेटची मदत आपल्याला महागात पडल्याची उदाहरणं समोर आली आहे. मुंबईतील गिरगावातील उदाहरण ताजं असतानाच पुन्हा एकदा असाच प्रकार उत्तर प्रदेशात घडल्याचं समोर आलं आहे. संकटात सापडलेल्या व्यक्तीनं मदतीसाठी गुगलवरून फोननंबर काढून मदत मागितली आणि पुन्हा एकदा स्वत:वर नवं संकट ओढवून घेतलं आहे.

उत्तर प्रदेशातील गाझियाबाद इथे लालकुआ परिसरात इमारत तयार होत असलेल्या प्लॉटमध्ये बैल अडकला होता. रस्त्याच्या पलिकडे असलेल्या रहिवासी इमारतीमध्ये राहणाऱ्या वकिलानं ह्या बैलाची मदत करावी या हेतूनं रेस्क्यू टीमला बोलवण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्याने गुगलवर नंबर शोधला आणि त्यांना फोन करून माहिती दिली. फोन केल्यानंतर अज्ञात व्यक्तीनं आम्ही मदत करू पण 10 रुपयांची पावती फाडावी लागेल त्यासाठी आधी तुम्हाला एक फॉर्म भरायचा आहे. त्यानंतर मदत करणाऱ्य़ासाठी आलेल्या वकिलाने फॉर्म भरला आपला मोबाईलनंतर आणि इतर डिटेल्स ऑनलाइन भरल्यानंतर त्याने अज्ञात व्यक्तीला सांगितलं की मी सगळी फॉमॅलिटी पूर्ण केली आहे. त्यावर अज्ञात इसमाकडून आमची रेस्क्यू टीम येऊन त्या बैलाची सुटका करेल असं सांगून फोन ठेवण्यात आला. रेस्क्यू टीम मात्र आली नाही उलट मदत करणाऱ्या वकिलाच्या खात्यामधूनच 1 लाख 2 हजार रुपये काढल्याचे 4 SMS आले आणि वकिलाला धक्का बसला. आपली सपशेल फसवणूक झाल्याचं लक्षात आलं.

हेही वाचा-काश्मिरमध्ये असं काय झालं की काही तासांतच पुन्हा सरकारने केली इंटरनेटबंदी

दरम्यान या घटनेची तक्रार दाखल करण्यासाठी त्यांना 22 दिवस स्थानिक पोलीस ठाण्याच्या चकरा माराव्या लागल्या. तिथल्या एकही व्यक्तीनं दादफिर्यादही घेतली नाही. तब्बल 22 दिवसांनंतर एसएसपीची भेट घेतली आणि तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार फॉर्मसाठी पाठवण्यात आलेल्या लिंकमधून वकिलाचा मोबाईल हॅक करून माहिती काढण्यात आली होती.

ऑनलाईन फसवणुकीपासून कसं सावध रहाल

इंटरनेटवरून एखादा हेल्पलाइन किंवा इतर काही नंबर घेत असाल तर त्याची पडताळणी करणं महत्त्वाचं आहे. अज्ञात साइटवरून काहीही डाउनलोड करू नका. आपला आयडी आणि बँक खात्याचा तपशील किंवा इतर आपले वैयक्तीक तपशील कोणत्याही अनोळखी लिंकवरील वेबसाइटला देऊ नका. तुम्हाला आलेला OTP कोणालाही सांगू नका. असं आवाहन सायबर तज्ज्ञांनी केलं आहे.

हेही वाचा-...म्हणून वडिलांनी आपल्या मुलाचे नाव ठेवले ‘छब्बीस जनवरी’

First published:

Tags: Gaziyabad, Uttar pradesh, Uttar pradesh news