बजेटमध्ये आता लोकही होऊ शकतात सहभागी, अर्थ मंत्रालयाचा नवा प्लॅन

बजेटमध्ये आता लोकही होऊ शकतात सहभागी, अर्थ मंत्रालयाचा नवा प्लॅन

येत्या 5 जुलैला मोदी सरकारचं पूर्ण बजेट सादर होईल

  • Share this:

मुंबई, 19 जून : केंद्रीय अर्थ मंत्रालयानं बजेटसंबंधी लोकांना जागरुक करण्यासाठी ट्वीटवर क्विज सीरिज सुरू केलीय. मंत्रालयानं अकाउंटवर पहिला प्रश्नही पोस्ट केलाय. त्यात विचारलं की स्वतंत्र भारताचं पहिलं बजेट कधी सादर केलं गेलं? मंत्रालयानं युजर्सला मतं देण्यासाठी चार पर्यायही दिलेत.

अर्थ मंत्रालयानं ट्वीटरवर प्रश्न-उत्तर अशी सीरिज सुरू केलीय. ट्वीटर वापरणाऱ्यांना पहिला प्रश्न हा विचारलाय की स्वतंत्र भारताचं पहिलं बजेट कधी सादर केलं? त्याला 4 पर्याय दिलेत.

क्रेडिट कार्ड डोकेदुखी झालीय? मग 'या' सवयी बदला

10वी उत्तीर्ण झालेल्यांची DRDO मध्ये भरती, 'अशी' होईल निवड

स्वतंत्र भारताचं पहिलं बजेट 26 नोव्हेंबर 1947 रोजी सादर झालं. त्यावेळचे अर्थमंत्री आर.के.षणमुखम यांनी ते सादर केलं. यावेळी अर्थमंत्री निर्मला सीतारामण बजेट मांडतील. मोदी सरकारचं हे पूर्ण बजेट आहे. 1 फेब्रुवारीला निवडणुकीआधी सरकारनं अंतरिम बजेट सादर केलं होतं.

खिशाला परवडणारा विमान प्रवास ! 'विस्तारा'च्या आकर्षक ऑफर्स

काय असतं पूर्ण बजेट?

नवं सरकार आल्यानंतर वर्षभराच्या खर्चाचा लेखाजोखा सादर केला जातो. यालाही पूर्ण बजेट म्हटलं जातं. यानुसार सरकारची मिळकत आणि खर्च सरकार जाहीर करतं. हे पूर्ण वर्षाकरता असतं. पूर्ण बजेटच्या आकड्यांवरून सरकार संसदेला येणाऱ्या आर्थिक वर्षात कशावर किती खर्च केला जाईल, ते सांगतं.

लोकसभा निवडणुकीआधी सादर झालं अंतरिम बजेट

1 फेब्रुवारी 2019 रोजी पियुष गोयल यांनी अर्थसंकल्प सादर केला होता. त्यात 5 लाखापर्यंत कमाई असणाऱ्या नोकरदारांना करमुक्त केलं होतं. पण स्लॅबमध्ये काही बदल नव्हते केले.

VIRAL FACT : गुगल मॅपवर दिसतोय शिवरायांचा फोटो, हे आहे व्हायरल सत्य

First published: June 19, 2019, 8:15 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading