क्रेडिट कार्ड डोकेदुखी झालीय? मग 'या' सवयी बदला

हल्ली प्रत्येकाकडेच क्रेडिट कार्ड असतं. पण ते वापरताना काही गोष्टी चुकूनही करू नका

News18 Lokmat | Updated On: Jun 19, 2019 07:17 PM IST

क्रेडिट कार्ड डोकेदुखी झालीय? मग 'या' सवयी बदला

मुंबई, 19 जून : क्रेडिट कार्ड असणं खरं तर उपयोगी असतं. पण बऱ्याचदा त्याचा वापर डोकेदुखी होते. मोठं ओझं होऊन जातं. याचं कारण आपल्या खर्च करण्याच्या सवयी आणि क्रेडिट मॅनेज न करू शकणं हे आहे.

क्रेडिट कार्ड वापरताना तुम्ही फक्त ते वापरण्याकडे लक्ष द्याल. पण ते मॅनेज करण्याकडे लक्ष दिलं नाही तर कर्जाचं मोठं जाळच पसरेल. त्यात तुम्ही अडकाल. याशिवाय तुमचा क्रेडिट स्कोअर खराब होईल. हे तुमच्या पोर्टफोलिओसाठी चांगलं नाही.

दर महिन्याला 80 हजार रुपये कमवण्याची संधी, सुरू करा 'हा' शानदार बिझनेस

भविष्यात तुम्हाला कधी कर्ज घेण्याची गरज लागली तर क्रेडिट स्कोअर चांगला नसला तर कर्ज मिळताना अडचणींचा सामना करावा लागेल. कारण बँक कर्ज देताना क्रेडिट स्कोअर पाहते. स्कोअर खराब असेल तर बँक तुम्हाला कर्ज नाकारूही शकते.

10वी उत्तीर्ण झालेल्यांची DRDO मध्ये भरती, 'अशी' होईल निवड

Loading...

तुम्ही नियमित क्रेडिट कार्ड वापरत असाल तर चुकूनही या गोष्टी करू नका

वेळेवर बिल न चुकवणं

तुम्ही क्रेडिट बिल ठरलेल्या तारखेला दिलं नाहीत तर तुमच्या समोर कर्जाचा डोंगर उभा राहू शकतो. क्रेडिट कार्ड होल्डर्सना पाच टक्के बिल द्यावं लागतं. पण तरीही तुम्ही पूर्ण बिल देण्याचा विचार करा. बिलाला कॅरी फाॅरवर्ड करणं चांगलं नाही.

बजेटमध्ये मिळू शकते इन्कम टॅक्सवर सवलत, मोदी सरकारची आहे 'ही' योजना

क्रेडिट कार्डावर जास्त अवलंबून राहणं

क्रेडिट कार्ड असणं म्हणजे तुम्ही पूर्ण खर्च त्यावरच टाकणं असं असू नये. क्रेडिट कार्डावर खर्च करत राहणं म्हणजे कर्ज वाढवणं. कधीही तुमच्या मिळकतीच्या 45 टक्क्यांहून जास्त कर्ज असू नये.

क्रेडिट कार्डानं पैसे काढणं

क्रेडिट कार्डानं पैसे काढणं हा शेवटचा पर्याय असू शकतो. क्रेडिट कार्ड पैसे काढण्यासाठी वापरू नये. तुम्ही जेव्हा क्रेडिट कार्डानं पैसे काढता, तेव्हा तुम्हाला इंटरेस्ट फ्री पीरियड मिळत नाही. पहिल्या दिवसापासून तुमच्यावर कर्ज सुरू होईल. सोबत पैसे काढण्याची फीही लागेल.

या गोष्टींची काळजी घेतलीत तर क्रेडिट कार्ड ओझं वाटणार नाही.


VIDEO : वर्ल्डकपमधून 'गब्बर' बाहेर, या आणि इतर महत्त्वाच्या 18 घडामोडी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 19, 2019 07:17 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...