10वी उत्तीर्ण झालेल्यांची DRDO मध्ये भरती, 'अशी' होईल निवड

10वी उत्तीर्ण झालेल्यांची DRDO मध्ये भरती, 'अशी' होईल निवड

डिफेन्स रिसर्च अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन म्हणजेच DRDO नं अनेक पदांसाठी भरती सुरू केलीय.

  • Share this:

मुंबई, 19 जून : डिफेन्स रिसर्च अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन म्हणजेच DRDO नं अनेक पदांसाठी भरती सुरू केलीय. यामध्ये टेक्निकल पदांवर भरती होणार आहे. इच्छुक आणि योग्य उमेदवार ऑफिशियल वेबसाइट drdo.gov.in वर जाऊन शेवटच्या तारखेआधी ऑनलाइन अर्ज करू शकतात. डीआरडीओ 301 पदांवर भरती करणार आहे. या पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झालीय. उमेदवार 26 जूनपर्यंत या पदांसाठी अर्ज करू शकतात.

उमेदवार कुठल्याही मान्यताप्राप्त बोर्ड किंवा संस्थेचा 10वी हवा. याशिवाय त्याच्याकडे कुठल्याही मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचं प्रमाणपत्र हवं. किंवा आवश्यक विषयांमध्ये कुठल्याही मान्यताप्राप्त संस्थेचं एक वर्ष कालावधीचं प्रमाणपत्र हवं.

बजेटमध्ये मिळू शकते इन्कम टॅक्सवर सवलत, मोदी सरकारची आहे 'ही' योजना

या पदांसाठी सामान्य वर्गातल्या उमेदवारासाठी वयाची मर्यादा 18 वर्षांपासून 28 वर्षांपर्यंत आहे. आरक्षित उमेदवाराला सवलत आहे. अर्ज करणाऱ्याला अर्जाची फी द्यावी लागेल. ती आहे 100 रुपये. ही फी क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, नेट बँकिंग या माध्यमांतून भरता येईल.

भारतीय रेल्वेत बंपर व्हेकन्सीज्, लवकर करा अर्ज

DRDO ही सरकारी संस्था आहे. सैन्यासाठी रिसर्च आणि डेव्हलपमेंटचं काम करते. सैन्यासाठी उपयोगी अशी संशोधनं करते. या संस्थेच्या एकूण 52 प्रयोगशाळा आहेत. जवळजवळ 5 हजार संशोधक इथे काम करतात. शिवाय टेक्निकल आणि इतर कर्मचारी 25 हजाराच्या आसपास आहे.

दर महिन्याला 80 हजार रुपये कमवण्याची संधी, सुरू करा 'हा' शानदार बिझनेस

दरम्यान गेल्या महिन्यात लष्करासाठीही भरती निघाली होती. तरुणांनी लष्कराकडे वळावं म्हणून नवी योजनाही आणली होती. संरक्षण मंत्रालयाच्या सूत्रांनी एका इंग्लिश वर्तमानपत्राला सांगितलं होतं की, सैन्यात अधिकाऱ्यांची कमतरता जाणवतेय. म्हणूनच नवं पाऊल उचललं जाणार आहे. नव्या पॅकेजची तयारी पूर्ण झालीय. मिळालेल्या माहितीनुसार 10 वर्ष काम करून लष्कराची सेवा सोडणाऱ्या अधिकाऱ्यांना 17 लाख रुपये मिळणार. तर 14 वर्ष सेवाकाळ पूर्ण केला तर 38 लाख रुपये दिले जातील.


VIDEO : अधिवेशनात भाजपचे मंत्री गप्पा मारतात, काँग्रेसचे गटनेते तावडेंवर भडकले

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: DRDO
First Published: Jun 19, 2019 06:00 PM IST

ताज्या बातम्या