मुंबई, 19 जून : विमानानं प्रवास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी. विस्तारा एअरलाइन्सनं पावसाचा मोसम पाहताच मोठ्या ऑफर्स आणल्यात. यात प्रवासी 1299 रुपयांमध्ये प्रवास करू शकतात. कंपनीच्या इकाॅनाॅमी क्लाससाठी 1299 रुपये आणि प्रीमियम इकाॅनाॅमी क्लाससाठी 1999 रुपयांची तिकिटं पडतील. तुम्ही आताच तिकीट बुक करा. मग 3 जुलै ते 26 सप्टेंबर दरम्यान तुम्ही या सवलतीत प्रवास करू शकता.
बिझनेस क्लास तिकीट 4999 रुपये
या सेलमध्ये बिझनेस क्लासचं तिकीट 4999 रुपयांना मिळेल. हा सेल 17 जून 2019ला सुरू झाला. आता तो 19 जून 2019 च्या रात्री 11 वाजून 59 मिनिटांपर्यंत आहे. 1299 रुपयांना मिळणारं तिकीट हे जम्मू-श्रीनगर मार्गावरचं आहे. विमानकंपनीनं सांगितलंय की फर्स्ट कम फर्स्ट सर्व्ह यावर ही तिकिटं विकली जातील. ती संपली तर मग नियमित भाडंच भरावं लागेल.
भारतीय रेल्वेत बंपर व्हेकन्सीज्, लवकर करा अर्ज
या सवलतीत चेन्नई ते मुंबई तिकीट 3099 रुपयांना मिळेल. तर दिल्ली ते अहमदाबाद तिकीट 1799 रुपयांना मिळेल. दिल्ली ते मुंबई तिकीट 2799 रुपयांना मिळेल. तुम्ही कंपनीच्या वेबसाइटवर जाऊन तिकीट बुक करू शकता.
दर महिन्याला 80 हजार रुपये कमवण्याची संधी, सुरू करा 'हा' शानदार बिझनेस
विस्तारानं आपल्या पोर्टलमध्ये सांगितले नियम
इकाॅनाॅमी क्लास आणि प्रीमियम इकाॅनाॅमी बुकिंग 15 दिवस आधी करावं. तर बिझनेस क्लाससाठी कमीत कमी 3 दिवस आधी बुकिंग करावं.
खडसेंची एण्ट्री झाली अन् अजित पवारांसह विरोधकांनी मुख्यमंत्र्यांना लगावला टोला
कंपनीनं केली 62 नव्या उड्डाणांची घोषणा
विस्तारानं 62 नव्या उड्डाणांची घोषणाही केलीय. लवकरच कंपनी मुंबईहून 10 शहरांना जोडणारी विमानसेवा सुरू करणार आहे. अमृतसर, बंगळुरू, दिल्ली, गोवा, हैदराबाद, कोलकत्ता इथे मुंबईहून विमानसेवा सुरू आहेत.
अनेक विमान कंपन्या अशा आॅफर्स घेऊन आल्यात. GoAir च्या तिकिटाची सुरुवात 1769 रुपयांनी होतेय. त्याबरोबर GOAIR10 प्रोमो कोड अप्लाय करा. म्हणजे तुम्हाला 10 टक्के आणखी सूट मिळू शकते. तुम्हाला 10 टक्के सूट हवी असेल तर goair.in किंवा Go Air अॅपवरच बुकिंग करायला हवं.
स्पाइसजेट या विमान कंपनीनं मुंबई ते बँकाॅक रिटर्न ही सेवा सुरू केलीय. या विमानाचं तिकीट आहे फक्त 10095 रुपये.
सिद्धार्थ जाधवच्या गुडघ्याला पुन्हा बाशिंग! यासोबत इतर महत्त्वाच्या घडामोडी