कोरोनाचा कहर! अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या तरुण पुतण्याचा मृत्यू

कोरोनाचा कहर! अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या तरुण पुतण्याचा मृत्यू

सिराज साबिर कासकर याला श्वसनाचा त्रास सुरू झाल्यानं त्याला तातडीनं कराची येथील एका खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं.

  • Share this:

कराची, 25 डिसेंबर: अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम (Dawood Ibrahim) याच्या पुतण्याचा कोरोनामुळे  (Coronavirus) मृत्यू झाला आहे. सिराज साबिर कासकर (वय-38) असं त्याचं नाव आहे. दाऊदचा थोरला भाऊ साबिर कासकर याचा तो मुलगा होता.

सिराज साबिर कासकर याला श्वसनाचा त्रास सुरू झाल्यानं त्याला तातडीनं कराची येथील एका खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. परंतु प्रकृतीत सुधारणा होत नसल्यानं त्याला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. मात्र, त्याची प्रकृती अधिकच ढासळली आणि त्याचा बुधवारी मृत्यू झाला.

हेही वाचा...Covid-19 लशीबाबत चिंता वाढवणारी बातमी! अ‍ॅलर्जीचे प्रकार आले समोर

'टाइम्स ऑफ इंडिया'ने दिलेल्या वृत्तानुसार, दाऊदचा थोरला भाऊ साबिर कासकर याचा मुलगा सिराज साबिर कासकर(वय-38) हा कोरोना पॉझिटिव्ह आढळला होता. श्वसनाचा त्रास सुरू झाल्यानं त्याला तातडीनं कराची येथील एका खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. मात्र, उपचार सुरू असतानाच त्याची प्राणज्योत मालवली. भारतीय सुरक्षा एजन्सीला कराचीहून येणाऱ्या कॉल्सच्या माध्यमातून ही माहिती समजलं.

दरम्यान, पाकिस्तानात (Pakistan) कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांत कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे आधीच विविध अडचणींचा सामना करावा लागणाऱ्या आरोग्य यंत्रणेसमोर मोठा प्रश्न उभा राहिला आहे. पाकिस्तानात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उपाययोजना करण्यात आरोग्य यंत्रणा कमी पडत असल्याचं समजतं.

पाकिस्तानात दररोज आढळतात 2000 नवे रुग्ण...

पाकिस्तानात गेल्या नोव्हेंबरनंतर कोरोनाचा कहर पुन्हा वाढला आहे. दररोज 2000 हून जास्त कोरोनाबाधित नवे रुग्ण आढळून येत असल्याचं आरोग्य यंत्रणा हादरली आहे.

हेही वाचा...नाशिक प्रशासन हादरलं! पोलीस प्रशिक्षण केंद्रात 170 जणांना कोरोनाची लागण

'डॉन'नुसार, पाकिस्तानात आतापर्यंत कोरोनामुळे 9,668 नागरिकांना प्राण गमवावे लागले आहेत. एकूण 4 लाख 65 हजाराहून जास्त नागरिक कोरोनाबाधित आहेत. दरम्यान, पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तयार करण्यात आलेल्या नियमांची सक्तीनं अंमलबजावणी करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले आहेत.

Published by: Sandip Parolekar
First published: December 25, 2020, 3:02 PM IST

ताज्या बातम्या