न्यूयॉर्क, 25 डिसेंबर : भारतात अद्याप कोरोनाची लस आलेली नाही. पण लशीच्या चाचण्या अगदी शेवटच्या टप्प्यात आहेत. अशा वेळी ज्या देशात लसीकरणाला सुरुवात झाली आहे, तिथून एक चिंता वाढवणारी बातमी आली आहे. Coronavirus ची लस (covid-19) टोचून घेतलेल्यांना आता त्याचे साइड इफेक्ट्स दिसू लागले आहेत. विशेषतः अमेरिकेत ज्यांनी फायझरची लस (Pfizer COVID-19 vaccine) घेतली आहे त्यातल्या काहींना त्याची अॅलर्जी दिसायला लागले आहेत. त्यामुळे लशीचे वैज्ञानिक आणि डॉक्टरांची चिंता वाढली आहे. जगभरात आता कोरोना लशीकरणाबाबत संशयाचं वातावरण निर्माण होऊ लागलं आहे.
अमेरिका आणि ब्रिटनमधून आलेल्या बातमीनुसार, Pfizer लस टोचल्यानंतर अनेक लोकांनी अॅलर्जी आल्याची तक्रार केली आहे. अमेरिकन सरकारने फायझर आणि मॉडर्ना (Moderna) लशींना आपत्कालीन विषय म्हणून मान्यता दिली होती. ब्रिटनमध्ये ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीची अॅस्ट्राझेनेका ((AstraZeneca) लस अधिक प्रमाणात दिली जात आहे. या देशातही इमर्जन्सी अप्रूव्हल देऊन लसीकरण सुरू करण्यात आलं आहे.
भारतात लस निर्माण करणाऱ्या तीन कंपन्यांनी अशाच प्रकारच्या इमर्जन्सी अप्रूव्हलची मागणी मोदी सरकारकडे केली होती. पण सरकारकडून अद्याप तशी परवानगी देण्यात आलेली नाही.
मेड इन इंडिया कोरोना लस (CORONA VACCINE) कोवॅक्सिनचा (COVAXIN) पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील चाचणीचा (clinical trial) अहवाल जारी करण्यात आला. यामध्ये लस परिणाकारक आणि सुरक्षित असल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळे आता या लशीला भारतात आपात्कालीन वापरासाठी (EUA) परवानगी मिळवण्यासाठी पुन्हा हालचाली सुरू झाल्या आहेत. यासाठी दुसऱ्यांदा अर्ज करण्यात आला आहे.
कोवॅक्सिन लशीच्या आपात्कालीन वापराला (EMERGENCY USE) मंजुरी मिळावी यासाठी भारत बायोटेकनं (BHART BIOTECH) केंद्र सरकारकडे पुन्हा अर्ज केला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. या लशीचं सध्या तिसऱ्या टप्प्यातील क्लिनिकल ट्रायल सुरू आहे. पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील ट्रायलचा अहवाल कंपनीनं जारी केला आहे.