जग संपलं, मोदी आता मंगळावर फिरायला जातील : उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

थापामारत पंतप्रधान नरेंद्र मोदीचं सर्व जग फिरून झालं, आता ते मंगळावर थापा मारायला जातील असा हल्लाबोल शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधानांवर केला आणि शिवसेनेची टीकेची धार कमी झालेली नाही हे दाखवून दिलं.

Ajay Kautikwar | Updated On: Jun 19, 2018 05:32 PM IST

जग संपलं, मोदी आता मंगळावर फिरायला जातील : उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

मुंबई,ता.19 जून : थापामारत पंतप्रधान नरेंद्र मोदीचं सर्व जग फिरून झालं, आता ते मंगळावर थापा मारायला जातील असा हल्लाबोल शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधानांवर केला आणि शिवसेनेची टीकेची धार कमी झालेली नाही हे दाखवून दिलं. महाराष्ट्रात शिवसेनेची स्वबळावर सत्ता येणारच आहे, त्यासाठी शिवसनिकांनी तयार राहावं असं आवाहनही उद्धव ठाकरे यांनी केलं.

उद्धव ठाकरे यांच्या भाषणातले महत्वाचे मुद्दे

मेहबुबांचा पाठिंबा काढला पण...

जम्मू आणि काश्मीरमधल्या मेहबुबा मुफ्ती सरकारचा पाठिंबा काढला हे चांगलं झालं पण हा निर्णय घ्यायला तीन वर्ष लागले. 600 जवान शहीद झाले. त्यानंतर हे शहाणपण आलं. आता पाकिस्तानला नेस्तनाबूत करून दाखवा म्हणजे शहीदांना सन्मान होईल. केवळ गायींना वाचवणं म्हणजे हिंदुत्व नाही तर शहीद औरंगजेबाचा सन्मान करणं हे हिंदुत्व आहे.

स्बबळाचा नारा

महाराष्ट्रात शिवसेनेची सत्ताच येणार आहे. स्वबळावर सत्ता आणून शिवसेनेचाच मुख्यमत्री राज्यात सत्तेवर येणार आहे यात शंका नाही. जोपर्यंत विधानसभेवर भगवा फडकणार नाही तोपर्यं शिवसैनिकांनी शांत राहू नये. आम्ही सत्ता आल्यावर माजणार नाही आणि हरल्यावर थांबणार नाही. कठिण परिश्रम करून राज्यात सत्ता स्थापन करणारच.

अखेर शिशिर शिंदेंची 'घरवापसी',कान धरून मागितली शिवसैनिकांची माफी

स्वबळाचा नारा दिलाय, आता शांत बसू नका- आदित्य ठाकरे

आज शिवसेनेचा 52वा वर्धापन दिन, उद्धव ठाकरेंच्या भाषणाकडे सर्वांचं लक्ष

नरेंद्र मोदींवर हल्लाबोल

अमित शहांनी मातोश्रीव भेट घेतल्यानंतर शिवसेनेच्या टीकेची धार बोथट होईल असं सगळ्यांना वाटलं होतं. मात्र उद्धव ठाकरेंनी मोदींवर जोरदार हल्लाबोल केला. चार वर्ष फक्त थापा मारत मोदी फिरत राहिेले. सर्व जग फिरून झालं. आता मोदी फिरायला मंगळावरही जावू शकतात. तिथे जावूनही ते थापाच मारतील. जनतेच्या पैशातून जाहीरातींवर हजारो कोटी रूपये खर्च करण्यात येत आहेत.

मनसेच्या कार्यकारिणीतून शिशिर शिंदेंना डच्चू

पगडीचं राजकारण

पगडीचं राजकारण करून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे मराठी माणसांमध्ये फुट पाडण्याचं राजकारण करत आहेत. पण हे राजकारण कधीच यशस्वी होणार नाही. पगडी घालून कुणी मोठं होत नाही, पहिले डोकं ठिकाणावर आणलं पाहिजे. राजकारण करण्यासाठी तुमचं डोकं वापरा, दैवतांच्या पगड्या घालू नका.

नाणार होणार नाही

कुठल्याही परिस्थितीत नाणार रिफायनरी होणार नाही. कोकण भकास करून आम्हाला कारखाना नको. तुम्हाला वाटत असेल तर तो कारखाना विदर्भात घेऊन जा. कोकण वासियांची जमीन गेली आणि नोकऱ्याही मिळणार नाही.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 19, 2018 05:32 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close