S M L

स्वबळाचा नारा दिलाय, आता शांत बसू नका- आदित्य ठाकरे

शिवसेनेच्या ५२व्या वर्धापन दिन सोहळ्याचं उद्घाटन युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते झालं.

Sonali Deshpande | Updated On: Jun 19, 2018 12:16 PM IST

स्वबळाचा नारा दिलाय, आता शांत बसू नका- आदित्य ठाकरे

मुंबई, 19 जून : शिवसेनेच्या ५२व्या वर्धापन दिन सोहळ्याचं उद्घाटन युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते झालं. यावेळी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, स्वबळाचा नारा दिलाय, आता शांत बसू नका. शिवसेना आपल्याला देशभरात न्यायची आहे, असं त्यांनी निक्षून सांगितलं.

'पालघरमध्ये नैतिक विजय आपलाच आहे. आता एकहाती सत्ता आणायची असेल तर दोन्ही सभागृहात सर्वाधिक आमदार आपले असले पाहिजेत,' असं ते म्हणाले. निवडणुका कधीही लागू शकतात. शिवसेना आता महाराष्ट्राच्या बाहेर देशभरात न्यायची आहे. नुसती मतं नाही मनं ही जिंकायची आहेत, असं त्यांनी सांगितलं.

सकाळी 11 वाजेपासून  सायंकाळी 5 पर्यंत विविध विषयांवर चर्चासत्रं होणार आहेत. दरम्यान यामध्ये पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भाषणाकडे सर्वांचंच लक्ष लागून राहिलंय.आजच्या या वर्धापन दिनी उद्धव ठाकरे भाजप युतीबद्दल काही बोलणार का, याकडेही सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. तर आजच्या या 52 व्या वर्धापन दिनी सामना आग्रलेखातून भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार निशाणा साधण्यात आला आहे.

हेही वाचा

शिवसेना @ 52!

Loading...

वास्तुशांतीच्या महाप्रसादातून विषबाधा, 3 मुलांचा मृत्यू, 25 जणांची प्रकृती गंभीर

चीनमध्ये 'या' जागी फिरण्याचं धाडस तुम्ही कराल का?

'धुळीचे लोट फक्त दिल्लीतच नव्हे तर देशभरातच उठले आहेत. मोदी हे सतत परदेशात असल्याने त्यांच्या डोळ्यात व श्वासात धुळीचे कण जात नसावेत, पण जनता बेजार आहे. अडचणीत आहे. शिवसेनेचा मार्ग सरळसोट कधीच नव्हता. आजही नाही.' असं सामनाच्या आग्रलेखातून लिहण्यात आलं आहे.

तर 'शिवसेनेच्या मार्गात अडचणीचे डोंगर आहेतच. ते आपण ओलांडले की त्या डोंगराच्याच दगडांपासून आपल्या कार्याची स्मारके निर्माण होतील. महाराष्ट्रात स्वबळावर शिवसेनेची सत्ता येईलच येईल व दिल्लीच्या तख्तावर कोणी बसायचे याचा निर्णय घेणारी ताकद राष्ट्रीय पातळीवर शिवसेना निर्माण करील. तेवढा आत्मविश्वास आमच्यात नक्कीच आहे.' असं म्हणत शिवसेनेनं पुन्हा एकदा स्वबळाचा नारा दिला आहे.

आदित्य ठाकरेंच्या भाषणातले मुद्दे

आजचा दिवस अभिमानाचा आहे

आपण कुठे होतो अाणि कुठे आलो आहोत ते आपल्याला माहीत आहेत

५२ वर्षांत काय झगडावं लागलं आहे हे आपल्याला माहीत आहे

आपण कोणाच्या जीवावर मोठे झालो नाहीय

राष्ट्रसेवा, राष्टप्रेम हे एकच हित आपलं आहे

एकच आवाज आहे जो कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत आवाज घुमतो

अमरनाथ यात्रा सुरू करण्यात साहेबांचा मोठा वाटा आहे

सत्ता असताना आणि नसताना आपण जे काही करतो ते इतर कोण करत नाही

शेतकरी, विद्यार्थी, रोजगार यासाठी शिवसेना काम करते

हाडामांसाचे शिवसैनिक आपल्या पक्षात आहेत. कार्यकर्त्यांचा रोल महत्त्वाचा आहे

साहेबांचं एक वाक्य होतं ८० टक्के समाजकारण २० टक्के राजकारण पण आपण आता १५० टक्के समाजकारण आणि तितकेच टक्के राजकारण करतोय

आपण जे कार्य करतोय त्या जनसेवेला मी सलाम करतोय

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 19, 2018 12:10 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close