न्यूयॉर्क, 24 जुलै: आपण घेतलेला बदला आपल्याच जीवाशी येईल याची नुसती कल्पना केली तरी अंगावर शहारा येतो. अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बॉयफ्रेंडचा बदला घेण्यासाठी सगळ्या युक्त्या वापरुन झाल्यानंतर अखेर शेवटा पर्याय म्हणून पेट्रोल टाकून गाडी जाळण्याचा प्लॅन केला.
पेट्रोल वेगानं पेट घेतं याची कदाचित या तरुणीला कल्पना नसावी आणि म्हणूनच तिच्या बदल्याचा प्लॅन तिच्यावरच उलटला. या तरुणीनं रागाच्या भरात एक्स बॉयफ्रेंडच्या गाडीवर पेट्रोल टाकून आग लावली खरी पण त्याच्या झळा तिलाही बसल्याा. आगीच्या ज्वाळा वेगानं तरुणीच्या दिशेनं आल्या आणि ती होरपळली.
डेली मेलनं दिलेल्या वृत्तानुसार अमेरिकेतील मॅडिसन या परिसरात ही घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 21 जुलैला केली एस हायेस (Kelly S Hayes) नावाच्या तरुणीनं तिच्या एक्स बॉयफ्रेंडला धडा शिकवण्यासाठी तिने त्याच्या कारवर पेट्रोल टाकून आग लावली. यामध्ये कार जळून खाक झाली मात्र या दरम्यान आगीच्या ज्वाळा केलीवरही आल्या.
हे वाचा-अलर्ट! 48 हजार किमी ताशी वेगाने पृथ्वीच्या जवळ येत आहे 558 फूट उंच उल्का
हे वाचा-बापरे! हेलिकॉप्टर आणि ट्रक यांच्यात झाली टक्कर? वाचा या VIRAL VIDEO मागचे सत्य
ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून या प्रकरणी पोलिसांनी केलीला अटक केली आहे. या सगळ्यात केलीनं केलेला प्लॅन तिच्या जीवावर उलटला असता मात्र तिथल्या नागरिक आणि पोलिसांच्या प्रसंगावधानानं ती वाचली.
हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार एक्स बॉयफ्रेंडनं तिच्यावर फसवणूक केल्याचा आरोप केलीनं केला आहे. आधी तिनं बरंच सामान खरेदी केलं त्यानंतर तिने स्वत:च्या वाढदिवसादिवशी आपल्या एक्स बॉयफ्रेंडची गाडी जाळली. यामध्ये कारचं मोठं नुकसान झालं आहे. या प्रकरणाची दखल घेऊन पोलिसांनी केलीला अटक केली आहे.