मराठी बातम्या /बातम्या /देश /उदयनराजेंना रोखण्याची आवश्यकता नव्हती, विधानसभा अध्यक्षांचा खुलासा

उदयनराजेंना रोखण्याची आवश्यकता नव्हती, विधानसभा अध्यक्षांचा खुलासा

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषावर साक्षात त्यांच्या वारसांवरच आक्षेप घेतल्यामुळे महाराष्ट्रातील शिवभक्तांचा संताप उफाळून आला आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषावर साक्षात त्यांच्या वारसांवरच आक्षेप घेतल्यामुळे महाराष्ट्रातील शिवभक्तांचा संताप उफाळून आला आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषावर साक्षात त्यांच्या वारसांवरच आक्षेप घेतल्यामुळे महाराष्ट्रातील शिवभक्तांचा संताप उफाळून आला आहे.

नवी दिल्ली, 24 जुलै : भाजपचे राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले यांना शिवाजी महाराज यांची घोषणा  देण्यावरून सभापतींनी समज दिल्यामुळे राजकीय वातावरण तापले आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनीही या प्रकरणी निषेध व्यक्त करत आक्षेप घेण्याची कोणतीही आवश्यकता नव्हती, असं स्पष्ट मत व्यक्त केले आहे.

न्यूज18 लोकमतशी बोलत असताना नाना पटोले यांनी राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांच्या भूमिकेबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.

'सभागृहात शपथ घेताना जनभावना आणि श्रद्धा याचा देखील विचार करण्याची आवश्यकता आहे. मी जर असतो तर आक्षेप घेतला नसता, असं स्पष्ट मत नाना पटोले यांनी   व्यक्त केले आहे.

राज्यसभेत उदयनराजेंची शपथ ठरली वेगळी, सभापतींनी दिली समज, पाहा हा VIDEO

तर दुसरीकडे  उदयनराजे भोसले यांनी शपथ घेताना 'जय भवानी जय शिवाजी' अशी घोषणा दिली. मात्र, उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांनी 'जय भवानी जय शिवाजी' या घोषणेवर आक्षेप घेतला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषावर साक्षात त्यांच्या वारसांवरच आक्षेप घेतल्यामुळे महाराष्ट्रातील शिवभक्तांचा संताप उफाळून आला आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी राज्यभरात ठिकठिकाणी निषेध केला.

त्यानंतर उदयनराजे यांनी या प्रकरणावर खुलासा केला. 'रेकॉर्ड वर फक्त शपथ जाईल, असं सभापतींनी संगितलं. त्याच्यावर वाद विवाद होत आहे. शिवाजी महाराजांच्या नावाने खूप राजकारण झाले. महाराजांचा अवमान झाला असता तर मी गप्प बसणारा नाही. तिथल्या तिथे राजीनामा दिला असता,' असं म्हणत उदयनराजे भोसले यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

अशोक चव्हाण ठाकरे सरकारमध्ये नाराज? बाळासाहेब थोरात म्हणाले...

तसंच, 'ज्यांनी आक्षेप घेतला ते नेते काँग्रेस की राष्ट्रवादीचे मला माहीत नाही. जे घडले नाही ते भासविण्याचा प्रयत्न करू नका, अशी माझी विनंती आहे. काँग्रेसच्या सदस्याने का आक्षेप घेतला याचे उत्तर मला विचारण्याऐवजी राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेनेला विचारा. आक्षेप घेताना राज्यघटनेचा आधार घेतला. नायडू यांनी चुकीचे केले नाही,' असं उदयनराजेंनी स्पष्ट करत प्रकरणावर पडदा टाकला.

First published:
top videos

    Tags: Congress