मुंबई, 07 नोव्हेंबर : राज्यपालांच्या भेटीनंतर भाजपने दिलेल्या प्रतिक्रियेवर आता संजय राऊत यांनीही पत्रकार परिषद घेत प्रत्युत्तर दिलं आहे. काहीही झालं तरी आता शिवसेना मागे हटणार नसल्याचं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं आहे. तर यावेळी राऊतांनी आक्रमक भूमिका घेत भाजपवर टीकाही केली आहे. दरम्यान, शिवसेना पाठित खंजीर खुपसत नाही अशा शब्दात संजय राऊत यांनी सुधीर मुनगंटीवार यांच्यावर टीका केली आहे. देवेंद्र फडणवीस हे शिवसेनेचेही मुख्यमंत्री असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले होते. त्यावर संजय राऊतांनी आक्रमक प्रतिक्रिया दिली आहे. आता भाजपचे खेळ चालणार नाहीत. शिवसेना कधीही खोटं बोलत नाही त्यामुळे जे ठरलं आहे तेच होणार अशी शिवसेनेची ठाम भूमिका असल्याचं संजय राऊत म्हणाले. दरम्यान, जर भाजपकडे बहुमत असेल तर सिद्ध करावं आणि नसेल तर ते समोर येऊन मान्य करावं असंही संजय राऊत यांनी स्पष्ट केलं आहे. यावर आता भाजप काय प्रतिक्रिया देणार हे पाहणं महत्त्वाचं आहे.
Sanjay Raut: If you (BJP) have the numbers,form the govt. If you don't have the numbers then admit it. Constitution is for the people of this country,it is not their (BJP's) personal property.We know the constitution well.We'll form CM of Shiv Sena in Maharashtra constitutionally https://t.co/Tw1YL3Ubvl
— ANI (@ANI) November 7, 2019
संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे - उद्धव ठाकरे हे कायम त्यांच्या भूमिकेवर ठाम आहेत - भाजपला विचारा की ते त्यांच्या भूमिकेवर ठाम का नाही आहेत - शिवसेनेच्या भूमिकेत कोणताही बदल नाही. मुख्यमंत्री हा सेनेचाच होणार - सगळ्या आमदारांनी उद्धव ठाकरेंच्या भूमिकेला पाठिंबा दिला आहे - उद्धव ठाकरे जे ठरवतील ते करू हे सगळ्या आमदारांना मान्य आहे - आम्ही आमदारांना सुरक्षित स्थळी ठेवलेलं नाही - राज्यात अस्थिरता ज्यांच्यामुळे निर्माण होतेय ते राज्याचं नुकसान करत आहेत - सरकार मिळावं, या राज्याला ताकद देण्याचं काम शिवसेनेचा मुख्यमंत्री करेल - यापुढे राज्याचं नेतृत्त्व हे शिवसेनेचा मुख्यमंत्री करेल - उद्धव ठाकरेंनी ठाम भूमिका घेतली आहे की राज्याचं नेतृत्त्व हे शिवसेनेचा मुख्यमंत्रीच करणार - युती तोडण्याचं पाप मी करणार नाही, दुसरा पर्याय मी निवडणार नाही उद्धव ठाकरेंनी केलं स्पष्ट - चंद्रकांत पाटील आणि सुधीर मुनगंटीवार राज्यपालांना भेटले. महाराष्ट्राचा जनादेश महायुतीला मिळाला तर सरकार स्थापनेचा दावा का केला नाही - भाजप सगळ्यात मोठा पक्ष आहे तर राज्यपालांकडून रिकाम्या हाती का परत आले - 2014 आणि 2019च्या निवडणुकांमध्ये फरक आहे - दडपशाही आणि गंडगिरी आता चालणार नाही - आता आमची संयमाची भूमिका आहे - शिवसैनिक खोटं बोलत नाही आणि शिवसैनिक दिलेला शब्द पाळतो. - शिवसैनिक खोटं बोलून सत्तेत येत नाही त्यामुळे भाजपनेही तसं राहावं - सत्ता गेली की सारा माज निघून जातो - भाजपला बहुमत मिळेनासे झाले आहे - 8 तारखेपर्यंत विधानसभेची तारीख आहे. भाजप सर्वात मोठा पक्ष आहे पण सत्ता स्थापन करेनात - भाजपचे खेळ आता जूने झालेत. जर बहुमत असेल तर सिद्ध करावं नसेल तर समोर येऊन सांगावं - संविधानात राहून आम्ही शिवसेनेचा मुख्यमंत्री बनवू - मुख्यमंत्री भाजपचे होणार हे वारंवार भाजपचे नेते म्हणतात पण त्यांच्याकडे बहुमत नाही - भारतीय पक्षाने जाहीर करावं की आम्ही सरकार स्थापन करण्यासाठी असमर्थ आहोत. त्यानंतर शिवसेना पाऊलं उचलेन - सरकार स्थापन करण्यासाठी भाजप असमर्थ झाल्यास शिवसेनेचा पुढाकार घेणार - सरकार स्थापन करण्यासाठी शिवसेनेचं संख्याबळ तयार जर भाजपकडे असेल तर 2 दिवसांत राज्यपालांकडे जावं - भाजपने दोन दिवसांत 145 आमदारांची यादी दाखवावी - जनतेला शिवसेनेला फसवणाऱ्यांना धडा शिकवायचा आहे - भाजपकडून शिवसेनेला कोणताही प्रस्ताव नाही. - अडीच वर्ष शिवसेना आणि अडीच वर्ष भाजपचा मुख्यमंत्री यावर युती झाली आहे - शिवसेनेकडे आणखी वेगळे पर्याय आहेत - माझ्यावर कोणी नाराज असेल तर तो माझा सन्मान आहे - देवेंद्र फडणवीस हे जर भाजपचे मुख्यमंत्री असतील तर त्यांनी 145 ने बहुमत दाखवून शपथ घ्यावी.

)







