दिवसातून 10 वेळा अंघोळ करायची पत्नी, नोटासुद्धा धुवायची; पतीने हत्या करून केली आत्महत्या

दिवसातून 10 वेळा अंघोळ करायची पत्नी, नोटासुद्धा धुवायची; पतीने हत्या करून केली आत्महत्या

पत्नीला एका वाईट सवय जडली. घरातील सर्वांना आंघोळ करणं बंधनकारक केलं. त्यातून वैतागलेल्या पतीने पत्नीची हत्या केली आणि स्वतःही गळफास घेत आत्महत्या केली.

  • Share this:

म्हैसूर, 19 फेब्रुवारी - प्रत्येक माणसाला वेगवेगळ्या सवयी लालगेल्या असतात. काही माणसांच्या त्या एवढ्या अंगवळणी पडतात की पुढे जाऊन त्याची विकृती होते. आणि मग पुढे जे प्रकार होतात ते मात्र आयुष्याला कलाटणी देणारे किंवा आयुष्य संपवणारे असतात. मात्र कर्नाटकच्या म्हैसूरमधील एका महिलेच्या अशाच सवयीने एक कुटुंब उद्ध्वस्त झालं आहे. म्हैसूरमध्ये एका मध्यम वयाच्या व्यक्तीने पत्नीच्या अतीस्वच्छतेच्या सवयीला कंटाळून पत्नीचा खून केला आहे आणि स्वतःही आत्महत्या केली आहे. 40 वर्षीय शांतामूर्ती यांनी आपली 38 वर्षीय पत्नी पुट्टमणीची हत्या केली आहे. 15 वर्षांपूर्वी या दोघांचं लग्न झालं होतं. पुट्टमणी ही अतिस्वच्छतेबाबत आग्रही होती. त्यामुळेच तिच्या नवऱ्याने तिची हत्या केल्याचा दावा मृतांच्या नातेवाईकांनी आणि शेजाऱ्यांनी केला आहे.

मी पुट्टामुणीसारखी व्यक्ती आपल्या पूर्ण आयुष्यात पाहिली नसल्याचं त्यांचे शेजारी प्रभूस्वामी यांनी म्हटलं आहे. प्रभूस्वामी यांनी पुढे सांगितलं की, "मागील आठ वर्षांपासून पुट्टमणी मोठ्या प्रमाणावर अंधश्रद्धेच्या आहारी गेली होती. तिच्या घरात जाण्यापूर्वी सगळ्यांनी आंघोळ करावी असा तिचा आग्रह होता. त्यामुळे आम्हाला तिच्या घरात जायला भिती वाटत होती. तर शांतामूर्ती आणि पुट्टमणी यांना दोन मुलं होती. एक सात तर एक बारा वर्षांचा अशी होन मुलं आहेत. त्या मुलांनाही पुट्टमणी दिवसातून अनेकदा आंघोळ घातल होती.

इतर बातम्या - तमिळनाडूमध्ये खासगी बस आणि लॉरीची धडक, भीषण अपघातात 20 जणांचा मृत्यू

तुम्ही कधी कुणी चलनी नोटा धुतल्याचं पाहिलंय का? नसेल पाहिलं कारण तसं कुणी करत नाही. मात्र पुट्टीमणीने नवऱ्याने ठेवायला दिलेल्या चलनी नोटा धुतल्याचा तिच्यावर आरोप आहे. कारण तिला असं वाटायचं की या नोटा वेगवेगळ्या जाती-धर्माच्या व्यक्तींनी दूषित केल्या आहेत. आणि त्यांना स्पर्श केला आहे. असं तिला वाटायचं अशी माहिती त्यांचे नातेवाईक राजशेखर यांनी दिली. तर शांतामूर्ती यांनी आपल्या पत्नीच्या या हास्यस्पद वागण्याबद्दल आपल्याशी अनेकवेळा चर्चा केल्याचंही राजशेखर यांनी सांगितलं."

ती शुद्धतेच्या नावाखाली घरातील सगळ्यांचा मोठ्या प्रमाणावर छळ करत होती. वारंवार आंघोळीमुळे मुलं आजारी पडत असल्याचंही राजशेखर यांनी सांगितलं. शौचालयाला जाऊन आल्यानंतर. जनावरांना चारा घातल्यानंतर आणि कुणालाही स्पर्श केल्यानंतर आंघोळ करणं हे घरच्या माणसांसाठी पुट्टमणीने बंधनकारक केलं होतं. त्यामुळे या पतीपत्निंचं आपापसात वारंवार भांडणही होत असत.

इतर बातम्या - हिंगणघाट जळीत प्रकणातल्या आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न?

मात्र शांतामूर्ती यांचा मंगळवारी संयम सुटला. जेव्हा या पतीपत्नीचा शेतामध्ये प्रचंड मोठा वाद झाला. या वादात शांतामूर्तीने पुट्टमणीवर कुऱ्हाडीने वार करून तिची हत्या केली. आणि घरामध्ये आल्यानंतर स्वतःही गळफास घेऊन आत्महत्या केली.

इतर बातम्या - कमल हसन यांच्या सिनेमाच्या शूटिंगवेळी अपघात, असिस्टंट डायरेक्टसह 3 जणांचा मृत्यू

मुलं शाळेतून घरी येईपर्यंत शांतामूर्तीने पत्नीची हत्या केल्याचं आणि आत्महत्या केल्याचं कुणालाही माहित नव्हतं. मात्र मुलं शाळेतून घरी आल्यावर वडिलांना छतावर लटकलेलं पाहून ते शेजाऱ्यांकडे मदतीसाठी धावले. जेव्हा शेजारी शांतामूर्ती यांच्या घरात आले तेव्हा त्यांचा मृत्यू झाल्याचं त्यांच्या लक्षात आलं. त्यांनी पुट्टमणीचा शोध घेतल्यानंतर तिचा मृतदेहही त्यांना शेतात सापडला.

शांतामूर्ती आणि पुट्टमणी यांचे आणखी एक शेजारी असलेल्या प्रभू स्वामी यांनी सांगिततलं की," मंगळवारी सकाळपासून हे दोघे भांडण करत होते. जेव्हा पुट्टमणीने शांतामूर्तीला पुन्हा आंघोळ करायला लावली तेव्हाच या भांडणाला सुरूवात झाली. तर दुसऱ्या दिवशी बाजारात धान्य विकून घरी परतलेल्या शांतामूर्तीने पत्नीकडे पैसे दिले तेही तिने धुतले होते.

इतर बातम्या - BREAKING: जर्मनीच्या दोन वेगवेगळ्या बारमध्ये गोळीबार, 8 लोकांचा जागीच मृत्यू

या संपूर्ण घटनेचे साक्षीदार असलेले स्वामी म्हणाले की, शांतामू्र्ती यांनी कष्टाने कमावलेला पैसा पत्नीनं धुतल्यानं तो प्रचंड रागावला होता. त्यानंतर मी तिथून निघून गेलो. मात्र नंतर या दोघांच्या मृत्यूच्या बातमीने मला धक्काच बसल्याचं स्वामी म्हणाले. अतिस्वच्छता म्हणा किंवा अतीशुद्धतेच्या विकृतीमुळे हे सगळं घडल्याचं स्वामी म्हणाले.

First published: February 20, 2020, 9:14 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading