अविनाशी, 20 फेब्रुवारी : तमिळनाडूमधील अविनाशी परिसरात गुरुवारी पहाटेच्या सुमारास भीषण अपघात झाला आहे. खासगी बस आणि लॉरीची भीषण धडक झाली. या भीषण अपघातात 20 जणांचा जागीच मृत्यू झाला असून 24 जण जखमी आहेत. जखमींना नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. त्यापैकी अनेकांची प्रकृती गंभीर असल्याचं सांगितलं जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार बंगळुरुहून ही खासगी बस कोचीसाठी निघाली होती. प्रवाशांनी भरलेली बस भरधाव वेगात असतानाच गुरुवारी पहाटेच्या सुमारास लॉरीवर धडकली. हा अपघात इतका भीषण होता की खासगी बसचा पुढचा भाग पूर्ण लॉरीखाली गेला. याची भीषणता आपण फोटोतही पाहू शकता.
Tamil Nadu: 16 people feared dead in a collision between a private bus and a truck near Avinashi town of Tirupur district. The bodies have been taken to Tirupur government hospital. More details awaited. pic.twitter.com/hnRfx2ctil
— ANI (@ANI) February 20, 2020
दुर्घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळाची पाहाणी केली. पोलिसांनी प्रवाशांना बसमधून बाहेर काढून त्यांना रुग्णालयात दाखल केलं आहे. या अपघातामध्ये 20 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. तर 24 जण जखमी झाले आहेत. हा अपघात नेमका कशा मुळे झाला? बस चालकाचं नियंत्रण सुटल्यानं अपघात झाला का? या संपूर्ण घटनेची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे.
दुसरीकडे कमल हसन यांच्या सिनेमाच्या शूटिंगवेळी क्रेन कोसळली, असिस्टंट डायरेक्टसह 3 जणांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.सुपरस्टार कमल हसन यांच्या सिनेमाच्या शुटिंगदरम्यान सेटवर भीषण अपघात झाला आहे. चेन्नईच्या ईवीपी स्टूडिओमध्ये क्रेनच्या अपघातामध्ये 3 जणांचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, क्रेन कोसळल्याने तीन जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात 10 लोक जखमीही झाले आहेत. वृत्तानुसार, कमल हासन रुग्णालयात पोहोचून लोकांची काळजी घेत आहे. हा भीषण अपघात झाला तेव्हा तो त्या ठिकाणी उपस्थित होते.
सविस्तर बातमी वाचा-कमल हसन यांच्या सिनेमाच्या शूटिंगवेळी अपघात, असिस्टंट डायरेक्टसह 3 जणांचा मृत्यू