हिंगणघाट जळीत प्रकणातल्या आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न?

हिंगणघाट जळीत प्रकणातल्या आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न?

विकेश सध्या नागपूरमधल्या तुरुंगात आहे. लोकांचा राग लक्षात घेता त्याला एका विशेष सेलमध्ये ठेवण्यात आलंय. इतर कैद्यांपासूनही त्याला धोका असल्याची शक्यता व्यक्त केली जातेय.

  • Share this:

वर्धा 20 फेब्रुवारी : महाराष्ट्रात गाजलेल्या हिंगणघाट जळीत प्रकरणातला आरोपी विकेश नगराळे याने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती पुढे आलीय. विकेश सध्या नागपूरमधल्या तुरुंगात आहे. लोकांचा राग लक्षात घेता त्याला एका विशेष सेलमध्ये ठेवण्यात आलंय. इतर कैद्यांपासूनही त्याला धोका असल्याची शक्यता व्यक्त केली जातेय. त्यामुळे जेल प्रशासन खास काळजी घेत आहेत. त्याच्या हालचालींवरही पोलिसांची नजर आहे. मात्र असं असतानाही त्याने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती बाहेर आल्याने चिंता व्यक्त केली जातेय.

विकेश हा विशेष सेलमध्ये असतो. त्याला जे ब्लॅंकेट देण्यात आलेलं होतं. त्याचाच वापर करत त्याने गळफास घेण्याचा प्रयत्न केल्याचं बोललं जातंय. काही दिवसांपूर्वीच त्याने असा प्रयत्न केल्याचीही माहिती दिली जातेय. मात्र तुरुंग प्रशासनाने अद्याप या वृत्ताला दुजोरा दिलेला नाही.

दरम्यान, आरोपी विकेश नगराळेची आज न्यायालयीन कोठडी संपणार आहे. आरोपी विकेशला बारा दिवसाची न्यायालयीन कोठडी दिली होती. या आधी सुरक्षेच्या कारणावरून रात्री साडेबारा वाजता त्याला हिंगणघाटच्या न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. आज हिंगणघाट न्यायालयात व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारा युक्तिवाद केला जाणार असल्याची शक्यताही आहे.

भाजपच्या माजी आमदाराचे पंचतारांकित हॉटेल उडवून देण्याची 'लश्कर-ए-तोयबा'ची धमकी

सात दिवस मृत्यूशी झुंझ दिल्यानंतर त्या पीडितेची लढाई सात दिवसानंतर संपली होती. नागपुरच्या ऑरेंजसिटी हॉस्पिटलमध्ये तिच्यावर उपचार सुरु होते. मात्र डॉक्टरांनी प्रयत्नांची शर्थ करूनही ती वाचू शकली नाही. या प्रकरणातला आरोपी विकेश नगराळे हा सध्या तुरुंगात आहे. त्याला या घटनेची माहिती जेव्हा पोलिसांनी दिली तेव्हा त्याचा चेहेरा निर्विकार होता अशी माहिती समोर आलीय. त्यानंतर पोलिसांजवळ तो बोलताना त्याने प्रतिक्रिया दिली की, माझ्यामुळे सगळ्यांनाच त्रास होत असेल तर मला गोळ्या घालून मारून टाका असं तो म्हणाल्याची माहिती समोर आलीय.

नागपूरच्या कर्मचाऱ्यांना घेतलं फैलावर; तुकाराम मुंढेंचा पारा चढला कारण...

विकेशनेच हिंगणघाटमधल्या एका चौकात पीडित प्राध्यापिकेच्या अंगावर पेट्रोल टाकून जाळलं होतं. त्यात ती 40 टक्के जळाली होती. या प्रकरणावर सर्व देशभरातून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. या प्रकरणाचा खटला हा फास्ट ट्रॅक कोर्टात चालविण्याची घोषणा राज्य सरकारने केली होती. प्रसिद्ध वकिल उज्ज्वल निकम हे सरकारतर्फे पीडितेची बाजू मांडणार असून आरोपीला कठोर शिक्षा होईल यासाठी प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी सांगितलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: hinganghat
First Published: Feb 20, 2020 08:52 AM IST

ताज्या बातम्या