नवी दिल्ली, 20 फेब्रुवारी : सुपरस्टार कमल हसन यांच्या सिनेमाच्या शुटिंगदरम्यान सेटवर भीषण अपघात झाला आहे. चेन्नईच्या ईवीपी स्टूडिओमध्ये क्रेनच्या अपघातामध्ये 3 जणांचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, क्रेन कोसळल्याने तीन जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात 10 लोक जखमीही झाले आहेत. वृत्तानुसार, कमल हासन रुग्णालयात पोहोचून लोकांची काळजी घेत आहे. हा भीषण अपघात झाला तेव्हा तो त्या ठिकाणी उपस्थित होते. या अपघातात मधु (29), दिग्दर्शक शंकर यांचे वैयक्तिक संचालक), कृष्णा (34) (सहाय्यक डायरेक्टर) आणि एक कर्मचारी चंद्रन (60) यांचा मृत्यू झाला आहे. खरंतर एस. शंकर हा सिनेमा दिग्दर्शित करत आहेत. या सिनेमाविषयी बरीच चर्चा आहे. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर प्रसिद्ध झाले. जेव्हा हा अपघात झाला तेव्हा इंडियन 2 या सिनेमाचं शूटिंग ईवीपी एस्टेट स्पॉटवर सुरू होतं. हा अपघात 19 फेब्रुवारीला रात्री 9.30च्या सुमारास झाला.
#UPDATE Chennai: Madhu (Personal Assistant to Director Shankar), Krishna (Assistant Director) and a staffer Chandran, have lost their lives in the incident. https://t.co/VpjDmRd9pU
— ANI (@ANI) February 19, 2020
या सिनेमाच्या पोस्टरमध्ये कमल हसन एका वयस्कर व्यक्तीची भूमिका साकारताना दिसत आहेत. हा सिनेमा 1996मधला कमला हसना यांच्या इंडियन सिनेमाचा सीक्वल आहे. हा सिनेमा ‘लिका’च्या बॅनरखाली बनवला जात आहे. त्यात सिद्धार्थ आणि काजल अग्रवालही महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहेत. विशेष म्हणजे हा सिनेमा कमल हसन यांचा शेवटचा सिनेमा असू शकतो. एका मुलाखतीत त्यांनी सांगितले होते की, आपण अभिनय क्षेत्र सोडत आहोत. राजकारणामुळे ते असं करीत आहेत. राजकारण आणि अभिनय दोन्ही एकत्र काम करू शकत नाहीत. त्यामुळे आता केवळ राजकारणावर लक्ष केंद्रित करू इच्छित आहेत. म्हणून त्यांनी असा निर्णय घेतला. याच कारणावरून अशी कल्पना व्यक्त केली जात आहे की, हा कमल हसन यांचा अखेरचा सिनेमा असू शकेल.