मुंबई, 25 जून : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput)ने 14 जून रोजी त्याच्या मुंबईतील घरी गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना त्याचा मित्रपरिवार, कुटुंबीय, सहकलाकार आणि चाहते यांच्यासाठी अत्यंत धक्कादायक होती. अभिनेत्याने वयाच्या अवघ्या 34व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. दरम्यान अनेकजण त्याला सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहत आहेत. तसच यानंतर बॉलिवूडमधील नेपोटिझमवर देखील बोलण्यास अनेकांनी सुरुवात केली आहे. सुशांतचे काही जुने फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याने, वारंवार त्याच्या जाण्याचे दु:ख उभारून येत आहे. नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हॉट्सअॅपवरून देखील हा व्हिडीओ फॉरवर्ड केला जात आहे. या व्हिडीओतून असा दावा केला जात आहे की, 14 जून रोजी सकाळी 9.30 वाजेपर्यंत सुशांत प्ले स्टेशनवर गेम खेळत होता.
(हे वाचा-एकुलत्या एक मुलाच्या जाण्याने पूर्णपणे कोलमडून गेलेत सुशांतचे वडील)
या व्हिडीओच्या माध्यमातून असा प्रश्न विचारला जात आहे की, जो माणूस गेम खेळत होता, तो नैराश्याने आत्महत्या कशी काय करेल? हे कसे शक्य आहे? असे अनेक प्रश्न सोशल मीडियावर विचारण्यात येत आहेत.
As per the records in PlayStation's official app, #SushantSinghRajput was active till 9:35 AM or later on 14 June 2020. He was playing Call of Duty: Modern Warfare. This means, he was not in a depression. Link: https://t.co/N8EwALTSSL#BeFairInSSRMurderCase #CBIEnquiryForSushant
— Shashank Rayal 🇮🇳 (@shashankrayal) June 21, 2020
Hi guys this is Sushant Singh Rajput playstation account the fact is when he went inside room with a glass of juice at that time he is playing playstation games you can check he's profile I'm not lieing after seeing this I can't stop my tears Marney vala gamekhelta @NidhiiTweets_ pic.twitter.com/xZZQQ2rKIY
— AksHay HuiLgol (@ahuilgol27) June 25, 2020
By seeing this video i m conform its a murder mot a sucide... #BeFairInSSRMurderCase love u sushant pic.twitter.com/FrTTW1ttK7
— Shambhavi Singh (@Shambha60560561) June 22, 2020
या व्हिडीओमध्ये दावा करण्यात येणारा प्लेस्टेशन आयडी खरोखर सुशांतचा आहे का, याची तपासणी पोलिसांकडून केली जात आहे. त्याचप्रमाणे पोलिसांचे असे म्हणणे आहे की सुशांतच्या फोनची फॉरेन्सिक तपासणी सुरू आहे. ज्यामध्ये या दाव्यांचा खुलासा होईल. मात्र सुशांतच्या चाहत्यांकडून सोशल मीडियावर हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे आणि त्याबरोबर सुशांतचा खून करण्यात आला असा आरोप त्याचे चाहते करत आहेत.
(हे वाचा-सुशांत आत्महत्या प्रकरण : गळा दाबल्याची जखम नाही, 5 डॉक्टरांच्या टीमचा खुलासा)
दरम्यान नुकत्याच आलेल्या सुशांतच्या पोस्ट मार्टम अहवालानुसार त्याचा मृत्यू गळफास घेतल्यानेच झाल्याचं डॉक्टरांच्या टीमकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. पोस्टमार्टम रिपोर्टनुसार, सुशांतच्या शरीरावर गळा दाबण्याच्या किंवा नखाच्या कोणत्याही जखमा नाहीत, असंही या टीमकडून सांगण्यात आलं आहे. या प्रकणात आतापर्यंत 23 लोकांचा जबाब नोंदवण्यात आला असला तरीही अजूनही काही लोकांची चौकशी करण्यात येणार आहे.