प्रसिद्ध फोटोग्राफर मानव मंगलानीने हा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. सुशांतच्या फोटोला घातलेला हार पाहून अनेकाच्या डोळ्यात पाणी तरळले आहे. आपले दु:ख व्यक्त करण्यासाठी आणि केके सिंह यांना सहारा देण्याऱ्या अनेक कमेंट्स लोकं या फोटोवर करत आहेत. सुशांत हा त्याच्या 4 बहिणींमध्ये एकटा भाऊ होता. (हे वाचा-सुशांत आत्महत्या प्रकरण : गळा दाबल्याची जखम नाही, 5 डॉक्टरांच्या टीमचा खुलासा) सुशांतच्या जाण्याने त्याच्या चाहतेवर्गामध्ये प्रचंड नाराजी आणि रागाची भावना निर्माण झाली आहे. झारखंड, पटना, मुंबई तसच देशातील काही ठिकाणाहून बॉलिवूडबाबत राग व्यक्त केला जात आहे. नुकताच सुशांत सिंह राजपूतचा पोस्टमार्टम रिपोर्ट समोर आला आहे, ज्यामध्ये पुन्हा एकदा सांगण्यात आले आहे की, गळफास लावल्यामुळे श्वास कोंडून सुशांतचा मृत्यू झाला. याप्रकरणात वांद्रे पोलीस आता विसरा अहवालाची वाट पाहत आहे. या प्रकरणाच्या मुळाशी जाण्यासाठी पोलिसांनी आतापर्यंत 23 जणांचा जबाब नोंदवला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Sushant sing rajput