पुण्यात कोरोनाचा धोका वाढला, गणेशोत्सव खरेदीसाठी हजारो नागरिक आणि शेकडो वाहनं रस्त्यावर

पुण्यात महात्मा फुले मंडई परिसरात गणेश उत्सव खरेदी करता हजारो नागरिक आणि शेकडो वाहनं रस्त्यावर आहेत.

पुण्यात महात्मा फुले मंडई परिसरात गणेश उत्सव खरेदी करता हजारो नागरिक आणि शेकडो वाहनं रस्त्यावर आहेत.

  • Share this:
पुणे, 20 ऑगस्ट : कोरोनाचं संकट असलं तरी राज्यात गणेशोत्सवासाठी तयारीला सुरूवात झाली. गणेशोत्सवाचा सण मोठ्या उत्सवात साजरा होतो पण यंदा लॉकडाऊन असल्यामुळे साध्या पद्धतीने हा सण साजरा करावा असं आवाहन राज्य सरकारकडून करण्यात आलं आहे. पुण्यातही गणेशोत्सव असताना लॉकडाऊन कायम असणार आहे. त्यामुळे पुण्यात महात्मा फुले मंडई परिसरात गणेश उत्सव खरेदी करता हजारो नागरिक आणि शेकडो वाहनं रस्त्यावर आहेत. कोरोनामुळे सोशल डिस्टंसिंग महत्त्वाचं आहे. पण पुण्यात मात्र आज प्रचंड वाजतुक कोंडी झाली आहे. अनेक नागरिक रस्त्यावर आल्यामुळे मोठी गर्दी झाली आहे. गणेश उत्सव साधेपणाने करा साजरा करा, शक्यतो ऑनलाईन शॉपिंग करा असं आवाहन केलं असताना खरेदीसाठी अनेक नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. या गर्दीमुळे कोरोनाचा धोका पुण्यात आणखी वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, कोरोनाच्या संकटात यंदा गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन पोलीस, सरकार आणि नेते मंडळींनी दिला आहे. यासाठी पुणे पोलिसांनी गणेशोत्सव कसा साजरा करावा यासंबंधी एक आचारसंहिता जारी केली आहे. यामध्ये पोलिसांनी आगमन व विसर्जन मिरवणूक काढू नये, असे आवाहन जनतेला केले आहे. पुणे शहरात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे गणेशोत्सवाच्या काळात नियमांचे पालन करणे गरजेचे असल्याचे पोलिस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी स्पष्ट केले आहे. तसेच, यंदाचा गणेशोत्सव साध्या पद्धतीनं साजरा करण्यावर भर द्यावा, असे आवाहनी त्यांनी नागरिकांना केले आहे. 1 सप्टेंबरपासून Flights Ticket महागणार, विमान प्रवासाबाबत हे दर सरकारने वाढवले अशी आहे पोलिसांची आचारसंहिता गणेश मूर्ती खरेदी गणेश मूर्तीची खरेदी ऑनलाईन पद्धतीने करावी यंदा स्टॉलला पदपथ, रस्त्यांवर परवानगी नाही शाळांची पटांगणे, मोकळ्या जागांवर स्टॉलला परवानगी श्री गणेश आगमनासाठी असणार असे नियम आगमन व विसर्जन मिरवणूक काढू नये आगमन व विसर्जनासाठी कमीत कमी नागरीकांची उपस्थिती असावी श्री गणेश प्रतिष्ठापना करताना घ्या काळजी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी श्रींच्या मूर्तीची प्रतिष्ठापना मंदिरातच करावी अनन्यसाधारण परिस्थितीत मनपाच्या नियम व अटींचे पालन करुनच छोट्या मंडपांना परवानगी रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्या विरोधकाला चहातून दिलं विष; प्रकृती गंभीर सार्वजनिक मंडळांसाठी श्रींच्या मूर्तीची मूर्तीची उंची चार फुट व घरगुती गणपतीसाठी दोन फुट असावी श्री गणेश पूजा करताना असतील असे नियम आरती व पुजेसाठी 5 व्यक्तींचे बंधन, बाहेरील व्यक्तींचा सहभाग असू नये सॅनिटायझर, मास्क व सोशल डिस्टंसींग अनिवार्य धोनीच्या निवृत्तीनंतरही पंतचे करिअर धोक्यात, 'हा' खेळाडू ठरतोय अडथळा! गणेश दर्शन ऑनलाइनच! दर्शनासाठी ऑनलाईन, केबल नेटवर्क, वेबसाईट व फेसबुक आदी माध्यमांचा वापर करावा ऑनलाईन व्यवस्था नसल्यास छोटे व्हिडीओ बनवून पाठवावेत दर्शनासाठी ऑनलाईन टोकन, डिजीटल पास द्यावा व सामाजिक अंतराचे पालन करावे कोणत्याही निमंत्रीत किंवा व्हिआयपी व्यक्तींना दर्शनासाठी आमंत्रीत करू नये
Published by:Renuka Dhaybar
First published: