नवी दिल्ली, 20 ऑगस्ट : जर तुम्ही पुढील महिन्यान विमान प्रवास करणार आहात, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण केंद्र सरकारने विमानतळावर प्रवाशांकडून घेतल्या जाणाऱ्या सुरक्षा शुल्कात (Aviation Security Fees) वाढ केली आहे. यावर्षी सरकारने Aviation Security Fee मध्ये 10 टक्क्यांनी वाढ केली आहे. हे शुल्क आता वाढून 160 रुपए प्रति प्रवासी झाले आहे. 1 सप्टेंबरपासून ही वाढ लागू होणार आहे.
यामुळे वाढवले गेले शुल्क
विमानतळावर सुरक्षेत वाढ झाली आहे. परिणामी त्याकरता होणाऱ्या खर्चातही वाढ झाली आहे. त्यामुळे एव्हिएशन सुरक्षा शुल्क देखील वाढवण्यात आले आहे. यामुळे विमान प्रवास महागण्याची शक्यता आहे. सीआयएसएफ देशातील 61 विमानतळांवर सुरक्षा उपलब्ध करून देते. कोरोना व्हायरस (Coronavirus) मुळे याठिकाणी सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
(हे वाचा-Transaction रद्द झाल्यावर पैसे परत न आल्यास करा हे काम, बँक देईल नुकसान भरपाई)
त्याचप्रमाणे सीआयएसएफकडून (CISF) प्रवाशांची तपासणी करताना पीपीई किट, मास्क, ग्लोव्ह्ज यांसारख्या सुविधांचा वापर केला जात आहे. एकंदरितच खर्चामध्ये यामुळे वाढ झाली आहे. एव्हिएशन सिक्यूरिटी फी वाढीसंदर्भात नागरी उड्डाण मंत्रालयाने 13 ऑगस्ट रोजी आदेश जारी केले आहेत. या आदेशानुसार सरकार ने एअरक्राफ्ट रूल्स 1937 चा वापर करत एव्हिएशन सिक्यूरिटी फीमध्ये वाढ करण्यास मजूरी दिली आहे.
(हे वाचा-दररोज 167 रुपयांची बचत करून होऊ शकता करोडपती, वाचा काय आहे योजना)
गेल्यावर्षी वाढले होते 20 रुपये
सरकारने एव्हिएशन सुरक्षा शुल्कात 2019 मध्ये 20 रुपयांनी वाढ केली होते. त्यानंतर हे शुल्क 150 रुपये प्रति प्रवासी झाले होते. देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय फ्लाइट्समधील या दोन्ही प्रवांसाठी हे शुल्क वाढवण्यात आले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.