मॉस्को, 20 ऑगस्ट : रशियाचे विरोधी पक्ष नेता आणि राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) चे विरोधी एलेक्सी नवलॅनी (Alexei Navalny) यांची प्रकृती गंभीर आहे आणि त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. त्यांच्या एका प्रवक्त्याने सांगितले की विमान प्रवासादरम्यान त्यांना कोणीतरी चहातून विष दिलं.
नवलॅनी एका कामासाठी सायबेरियाला गेले होते आणि तेथून मॉस्कोला परतत होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार नवलॅनी यांची अचानक तब्येत बिघडल्यामुळे फ्लाइटमधून आपात्कालिन लँडिंग करावी लागली.
Russian opposition leader Alexey Navalny (@Navalny) has been reportedly poisoned, he is now in intensive care in serious condition. His spokeswoman suspects the toxin was hidden in his tea. Read: https://t.co/D087CMVQWWpic.twitter.com/jUEYHnNJ6S
— Anonymous 🐈⬛ (@YourAnonCentral) August 20, 2020
Russian opposition politician Alexei Navalny is in a coma in a Siberian hospital after drinking a cup of tea that his spokeswoman said she believed was laced with poison: Reuters
— ANI (@ANI) August 20, 2020
नवलॅनी कोमात
नवलॅनी यांची प्रवक्ता किरा यारम्यश यांनी ट्विटरवर याबाबत माहिती दिली आहे. त्यांनी लिहिलं आहेकी नवलॅनी यांच्या जिवाला धोका आहे. त्यांनाही हेदेखील सांगितले की ते कोमात गेले आहेत. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार गरम चहात विष दिल्याकारणाने विष शरीरात खूप जलद गतीने प्रसरलं. यादरम्यान पोलिसांची टीमही रुग्णालयात पोहोचली आहे. किराने ट्विटरवर लिहिलं आहे की नवलॅनी यांना खूप घातक विष दिलं गेलं आहे. सध्या त्यांना आयसीयूत ठेवण्यात आलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: President Vladimir Putin