S M L

'तो' भूखंड सरकारचाच,कोणताही घोटाळा नाही -मुख्यमंत्री

हा सिडकोचा भुखंड नसून राज्य सरकारचा भुखंड आहे. जिल्ह्याधिकाऱ्यांच्या अधिकाराअंतर्गत हे हस्तांतर करण्यात आलं.

Sachin Salve | Updated On: Jul 4, 2018 12:00 AM IST

'तो' भूखंड सरकारचाच,कोणताही घोटाळा नाही -मुख्यमंत्री

मुंबई, 03 जुलै : हा सिडकोचा भुखंड नसून राज्य सरकारचा भुखंड आहे. त्यामुळे असा कोणताही भूखंड घोटाळा झाला नाही असं स्पष्टीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं.

काँग्रेसने राज्य सरकारवर नवी मुंबईत 17 कोटींचा भूखंड घोटाळ्याचा गंभीर आरोप केलाय. भाजपच्या नेत्यांनी मात्र हा आरोप फेटाळून लावला. आज मुख्यमंत्र्यांनी नवी मुंबईतील सिडकोच्या कथीत 24 एकर भुखंड घोटाळा प्रकरणी स्पष्टीकरण दिलंय.

सतराशे कोटींची जमीन बिल्डरच्या घशात, काँग्रेसचा मुख्यमंत्र्यांवर भ्रष्टाचाराचा आरोप

हा सिडकोचा भुखंड नसून राज्य सरकारचा भुखंड आहे. जिल्ह्याधिकाऱ्यांच्या अधिकाराअंतर्गत हे हस्तांतर करण्यात आलं. यात कोणताही घोटाळा नाही त्यामुळे सरकार कोणत्याही चौकशीला सामोर जायला तयार असल्यांचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय.

तसंच विरोधक राजकीय अफवा पसरवत असल्याची टीका देखील मुख्यमंत्र्यांनी केलीये. दरम्यान सरकारनं सिडकोची 24 एकर जमीन नियमबाह्य पद्धतीनं एका बिल्डरला हस्तांतरीत केल्याचा आरोप काल काँग्रेसनं पत्रकार परिषदेत केला होता.

Loading...

'काँग्रेसवर भाजपचा 500 कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा'

आज भाजप आमदार प्रसाद लाड यांनी  काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरूपम यासह महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे.

नवी मुंबई सिडको जमिन भ्रष्टाचाराचे आरोप आमदार लाड यांवर काँग्रेस पक्षाने केले होते. त्यानंतर आज लाड यांनी यासंदर्भात नोटीस पाठवली आहे आणि अब्रुनुकसानीचा दावा केलाय.

 

काय आहे काँग्रेसचा सरकारवर 1767 कोटींचा आरोप ?, ठळक मुद्दे

- सिडको नवी मुंबई येथील २४ एकर जमीन

- सिडको डेव्हलप करेल अशी तरतूद, संबंधित जमिन सिडको न ठेवतां कोयना धरणग्रस्तांसाठी दिली

- पॅरेडाईझ बिल्डर संबंधित जमीन नावावर करून घेतली

- मनिष भतिजा, संजय भालेराव यांनी जमीन बळकावली

- तहसीलदार मौजे ओवे येथील यांनी जमिन व्यवहार केले, सिडकोने मात्र यांवर काहीच हरकत घेतली नाही

- सरकारचा हा 1767 कोटी रुपयांचा जमीन घोटाळा आहे

- कोयना प्रकल्पामुळे विस्थापित झालेल्या 8 शेतकरी कुटुंबांना मुंबई विमानतळाजवळ खारघर इथं 24 एकर जमीन देण्यात आली होती

- या आठ शेतकऱ्यांची जमीन पॅराडाईज या कंपनीचे मनीष भतीजा आणि संजय भालेराव यांनी 15 लाख प्रतिएकर कवडीमोल किंमतीने आणि दमदाटीने खरेदी केली

-1767 कोटी रुपयांची जमीन फक्त 3 कोटी 60 लाख रुपयात जबरजास्तीने खरेदी केली

- हे बिल्डर भाजपचे आमदार आणि मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय प्रसाद लाड यांचे जवळचे मित्र आहेत तसेच पार्टनरही असू शकतात.

- 14 मे 2018 रोजी या जमिनीचं हस्तांतरण झालं आहे

- त्याच दिवशी या जमिनीची पॉवर ऑफ अॅटर्नी या बिल्डरांना मिळाली

- या प्रक्रियेला अनेक महिने लागत असताना त्याच दिवशी हा अधिकार कसा प्राप्त झाला?

- 23 जून 2018 रोजी मनीष भतीजा आणि संजय भालेराव यांनी पोलीस आणि खासगी सुरक्षा रक्षक घेऊन जमिनीचा ताबा घेतला.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 4, 2018 12:00 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close