लक्ष्मण घाटोळ, नाशिक 31 जानेवारी : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नाशिक जिल्हा दौऱ्याला आज पहाटे 6 वाजताच सुरवात झाली आहे. अजित पवार यांनी पुन्हा एकदा वेळेच्या आत कार्यक्रमला हजेरी लावल्याने प्रशासनाबरोबरच आयोजकांचीही धावपळ उडाली. 7 वाजेच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे 9 वाजता येतील असा अंदाज असताना अजित पवार मात्र वेळेत आल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. माझ्या मुळे सुर्यमुखी नाराज झाले असं म्हणत त्यांनी कार्यक्रमासाठी लवकर यावं लागल्यामुळे लोकांची माफीही मागितली. सकाळच्या थंडीतच त्यांनी भाषणाला सुरुवात केली. भाषणाच्या सुरुवातीलाच ते म्हणाले, लोक म्हणतात हा शपथविधीलाही सकाळीच येतो. अजित पवारांनी ही मिश्कील टिप्पणी करता सगळेच लोक हसायला लागले.
नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील लखमापूर येथील कादवा इंग्लिश स्कुल आणि कनिष्ठ महाविद्यालय या शाळेचं उद्घाटन अजित पवार यांच्या हस्ते त्यावेळी झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.
अजित पवार म्हणाले, अशोक चव्हाण आणि माझा वाद झाला असं काही नाही. भुजबळ यांचा खुर्चीसाठी वाद झाला हे सगळे गैर समज आहेत. अशा अफवांवर विश्वास ठेवू नका. काही लोकांनी हा मुद्दाम केलेला चावटपणा आहे अशी टीकाही त्यांनी केली.
ते पुढे म्हणाले, राज्यचं हित जोपासण्यासाठी विचारधारा दूर ठेवल्याचं नाकारता येणार नाही. आपल्या सगळ्यांना सकाळी माझ्या मुळे उठाव लागलं त्यामुळे माफ करा. शेतकऱ्यांना कर्ज माफीची अडचण येऊ देणार नाही याची आघाडी सरकारचा अर्थमंत्री म्हणून ग्वाही देतो. 2 लाखाच्या वरील कर्ज आणि नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना मदत देणार.
महाराष्ट्रातील शिक्षिका नायजेरियन गुन्हेगारांच्या जाळ्यात, तब्बल 21 लाखांची लूट
पोलीस पाटलांच थकीत वेतन प्रश्न मार्गी लावणार शिवभोजन थाळी नवी असल्याने त्रुटी असू शकता मात्र आपण बदल सुचवा तो करू. कर्ज माफी नंतर कमी दरात कर्ज पूरवठा करणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
पश्चिमेच पाणी महाराष्ट्त वळविण्यासाठी निधी कमी पडू देणार नाही. टॅक्सच्या माध्यमातून येणार निधी कमी पडतोय तरी विकासाची कामे करू. कांद्याचे भाव वाढले तेंव्हा केंद्राने विनाकारन कांदा आयात केले. माझ्या शेतकऱ्यांना 2 पैसे भेटत नाही तोच यांच्या पोटात का दुखतं. नव्याने 8 हजार पोलिसांनाची भरती सुरवातीला करणार. इतर विभागातही भरती करणार. 60 ते 70 हजार जागांची भरती करणार करणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ajit pawar