मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /महाराष्ट्रातील शिक्षिका नायजेरियन गुन्हेगारांच्या जाळ्यात, तब्बल 21 लाखांची लूट

महाराष्ट्रातील शिक्षिका नायजेरियन गुन्हेगारांच्या जाळ्यात, तब्बल 21 लाखांची लूट

शिक्षिकेला नायजेरियन गुन्हेगारांनी चक्क 21 लाखाला ऑनलाईन गंडा घातल्याची घटना उघडकीस आली आहे.

शिक्षिकेला नायजेरियन गुन्हेगारांनी चक्क 21 लाखाला ऑनलाईन गंडा घातल्याची घटना उघडकीस आली आहे.

शिक्षिकेला नायजेरियन गुन्हेगारांनी चक्क 21 लाखाला ऑनलाईन गंडा घातल्याची घटना उघडकीस आली आहे.

साहेबराव कोकणे, अहमदनगर, 30 जानेवारी : नगर जिल्ह्यातील जामखेड येथील एका शिक्षिकेला नायजेरियन गुन्हेगारांनी चक्क 21 लाखाला ऑनलाईन गंडा घातल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी अहमदनगर सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून सायबर पोलीस प्रकरणाचा तपास करत आहेत.

अनेकदा विविध आमिषं दाखवून ऑनलाईन पद्धतीने लोकांना लुटल्याचे प्रकार समोर येत असतात. मात्र जामखेड येथील एक शिक्षिकाच सायबर गुन्हेगारांच्या जाळ्यात सापडली. या शिक्षिकेला तब्बल 21 लाख रुपये गमवावे लागले आहेत. पोलिसांनी याप्रकरणी तक्रार दाखल करून घेतली असून पुढील तपास करण्यात येत आहे.

दरम्यान, नायजेरियन गुन्हेगारांच्या नावाखाली आता बाहेरील राज्यातूनच नव्हे तर महाराष्ट्रातील काही शहरातूनच या पद्धतीने फसवणूक झाल्याचे काही घटनांच्या तपासातून पुढे आलेले आहे. त्यामुळे सोशलमीडियाचा काळजीपूर्वक वापर करणे गरजेचे झाले आहे.

सोशल मीडियातून फक्त आर्थिक फसवणूकच नाही तर अनेकदा धार्मिक तेढही निर्माण केला जातो. या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर नव्या ओळखी करून घेताना सावधानता बाळगण्याचे आणि आर्थिक किंवा महागड्या वस्तूंच्या प्रलोभणाला बळी न पडण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

First published:

Tags: Ahmednagar, Online fraud