मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

तुकाराम मुंढेंच्या विरोधात व्यापाऱ्यांचा एल्गार, नागपूरसाठी घेतला मोठा निर्णय

तुकाराम मुंढेंच्या विरोधात व्यापाऱ्यांचा एल्गार, नागपूरसाठी घेतला मोठा निर्णय

नागपूर विदर्भातील व्यापाऱ्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स यांनी सर्व व्यापाऱ्यांची सोमवारी एक बैठक घेतली.

नागपूर, 18 ऑगस्ट : नागपूरमध्ये दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. त्यामुळे लॉकडाउन लागू आहे. नागपूर पालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनीही कडक भूमिका घेतली आहे. परंतु, आता नागपूरच्या व्यापाऱ्यांनीच मुंढेंच्या भूमिकेविरोधात दंड थोपटले आहे.

नागपूर विदर्भातील व्यापाऱ्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स यांनी सर्व व्यापाऱ्यांची सोमवारी एक बैठक घेतली. या बैठकीत बुधवारी बंदचा निर्णय घेण्यात आला आहे.मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी व्यापारांनी आणि त्यांच्या कर्मचार्‍यांनी 18 ऑगस्टपर्यंत चाचण्या कराव्या असे आदेश दिले होते. त्या आदेशाला व्यापाऱ्यांनी पाठिंबा दिला होता. पण आता त्याचा विरोधात एक दिवसाचा बंद पुकारलेला आहे.

सुशांत खरंच नैराश्याग्रस्त होता?आत्महत्येच्या 12 दिवसांआधीचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट

यावेळी व्यापाऱ्यांनी शहरात ऑड वन डे पॅटर्न बंद करावा,  आयुक्तांनी काढलेला ट्रेड लायसन्सचा आदेश रद्द करावा, व्यापारांच्या आणि त्यांच्या कर्मचार्‍यांच्याकोरोना टेस्ट कराव्या हा नियम मागे घ्यावा, एकाच बाजूचे दुकाने उघडल्यामुळे गर्दी होणारच त्यामुळे दोन्ही बाजूची दुकाने उघडण्यात यावे, एक प्रदेश एक नियम असावा, अशा मागण्या व्यापारी संघटनेनं केल्या आहे.

या मागण्या पालिका प्रशासनाने मान्य कराव्या यासाठी बुधवारी एक दिवस व्यापार बंद राहणार असल्याचे नाग विदर्भ चेंबर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष बी.सी. भरतीया यांनी सांगितले.

सुशांत खरंच नैराश्याग्रस्त होता?आत्महत्येच्या 12 दिवसांआधीचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट

दरम्यान, तुकाराम मुंढे आणि वाद हा नवा राहिला नाही. याआधीही भाजपचे महापौर संदीप जोशी आणि तुकाराम मुंढे यांच्यात वाद पेटला होता. एवढंच नाहीतर तुकाराम मुंढे यांनी एलेक्सिस रुग्णालय प्रकरणी  केलेल्या कारवाई विरोधात कोर्टात याचिकाही दाखल करण्यात आली होती. या प्रकरणी कोर्टाने पालिका प्रशासनाला दणका दिला होता.

First published:

Tags: Tukaram mundhe, तुकाराम मुंढे