मुंबई, 18 ऑगस्ट : अभिनेता सुशांत सिंग राजपूत प्रकरणी तपासाला वेग आला आहे. त्यामुळे दररोज नव नवीन माहिती समोर येत आहे. सुशांतने ज्या दिवशी आत्महत्या केली होती, त्याच्या आधी त्याने एका मित्राशी संवाद साधला होता. त्याचे मेसेज आता समोर आले आहे. सुशांत सिंह राजपूत हा नैराश्यात नव्हता तर त्याला नैराश्यात जाण्यास भाग पाडले गेले आणि त्यामुळे सुशांतने आत्महत्या केली, असं वारंवार सांगत सुशांतच्या मित्रांनी सुशांत आत्महत्या प्रकरणाची सीबीआय चौकशीची मागणी केली. अशाच एका सुशांतच्या मित्राने आता सुशांत प्रकरणी एक धक्कादायक खुलासा करत सुशांत नैराश्यात नव्हता, असा दावा केला असून नक्कीच सुशांतच्या आत्महत्ये मागे गौडबंगाल आहे असा संशय व्यक्त केला आहे. पुणेकरांसाठी आनंदाची बातमी, नव्या आकडेवारीने बदलले शहराचे चित्र, पाहा हा आलेख ही व्यक्ती आहे कुशल झवेरी. याच व्यक्ती सोबत सुशांतने आपल्या करिअरची सुरुवात केली होती आणि याच कुशल झवेरीयांच्या ‘पवित्र रिश्ता’ सारख्या सुपर हिट सिरीयलमध्ये सुशांतने काम केले होते. त्या दरम्यान खूप मजा मस्ती केली होती, असंही कुशलने सांगितले. त्याचा स्वभाव पाहता सुशांत हा नैराश्यात जाणारा नव्हता असा दावा कुशल झवेरी यांनी केला असून पुरावा म्हणून त्यांनी एक व्हॉट्सअॅप चॅट प्रसिद्ध केले आहे. या व्हॉट्सअॅप चॅटमध्ये असा झाला संवाद - 1 जून 2020 : सायंकाळी 6 वाजून 21 मिनिटांनी सुशांतने कुशलला एक मॅसेज केला सुशांत सिंग : कसा आहेस भावा, नक्कीच तू ठणठणीत आहेस आणि तुझे काम ही जोरात सुरू असणार..तुझी खूप आठवण येते. जय शिव शंभू -सुशांत - 2 जून सकाळी 9 वाजून 42 मिनिटांनी कुशल सुशांतच्या मेसेजला रिप्लाय देतो कुशल झवेरी : तुझा मेसेज वाचून आनंद झाला भावा मी ठणठणीत आहे. संघर्ष सगळ्यांसाठी आहे आणि मी त्याला अपवाद नाही. आशा करतो की तुझेही सर्व ठीक चाललंय. - 2 जून सकाळी 9 वाजून 47 मिनिटांनी सुशांत कुशलच्या मेसेजला रिप्लाय देतो - सुशांत : हो भावा, मी स्वत:वर आध्यात्मिकतेने काम करतोय आणि पुढे जाण्याचा प्रयत्न करतोय. जेव्हा कधी मी तुझ्या बाबतीत विचार करतो तेव्हा मला आपले ते सोनेरी दिवस आठवतात. मी ते दिवस खूप मिस करतो. ते दिवस किती अनमोल होते. मी एवढंच बोलू इच्छितो की, आपण सोबत जे काम केलंय ते काम असं आहे की, त्यावर आपल्याला अभिमान वाटला पाहिजे आणि त्यालाच पुढे जाण्याचा मार्ग बनवला पाहिजे ज्यामुळे आपण सदैव एकत्र राहू. प्लिज सीडला पण माझं प्रेम दे आणि त्याला सांग की मी त्याला ही खूप मिस करतोय. सगळ्यांना भरभरून प्रेम - 2 जून सकाळी 9 वाजून 48 मिनिटांनी कुशल सुशांतच्या मेसेजला रिप्लाय देतो कुशल झवेरी : हो भावा, तो सोनेरी काळ होता आपल्या सगळ्यांचा, मी आणि सिड बोललो यांवर अनेकदा.. अमित शाह यांना AIIMSमध्ये केलं दाखल, दुसऱ्य़ांदा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह सुशांत आणि कुशल मधील हे मेसेज 1 आणि 2 जून 2020 या दरम्यानचे आहेत म्हणजे सुशांतच्या आत्महत्येआधी फक्त 12 दिवसांपूर्वीचे हे मेसेज आहेत. त्यामुळे दिग्दर्शक कुशल झवेरीने त्याच्या व्हाॅटसअॅप चॅटचा आधार घेत सुशांत नैराश्यात नव्हता असा दावा केला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.