• Home
  • »
  • News
  • »
  • news
  • »
  • धडक दिल्यानंतर झाडासह टँकर धावत होता, विचित्र अपघाताचा VIDEO व्हायरल

धडक दिल्यानंतर झाडासह टँकर धावत होता, विचित्र अपघाताचा VIDEO व्हायरल

पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर एका विचित्र अपघाताचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

  • Share this:
पुणे, 27 मे :  पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर एका विचित्र अपघाताचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. एका भरधाव ट्रँकरने लिंबाच्या झाडाला धडक दिली त्यानंतर झाडासह हा ट्रँकर तब्बल 1 किमी अंतर पार करून थांबला. पुणे-सोलापूर महामार्गावर 26 मे रोजी कुरकुंभ जवळ हा अपघात झाला. MH12 RN 1916 नंबरचा हा टँकर भरधाव वेगाने जात होता. कुरकुंभजवळ पोहोचल्यावर टँकर चालकाचे अचानक टँकर वरील नियंत्रण सुटले. त्यानंतर हा टँकर महामार्गाच्या बाजूला असलेल्या लिंबाच्या झाडावर आदळला. ही धडक एवढी जबरदस्त होती की, टँकरच्या धडकेनं लिंबाचं झाड खोडापासून तोडले. त्यानंतरही हा टँकर थांबलाच नाही. हा टँकर एक किलोमीटर झाडासह उलट दिशेनं धावत होता, त्यानंतर जाऊन थांबला. सुदैवाने या दुर्घटनेत कुठलीही जिवीतहानी झाली नाही. टँकर झाडासह धावत असल्यामुळे महामार्गावर एकच गोंधळ उडाला होता. या घटनेचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. धावत्या पिकअपने घेतला पेट दरम्यान, जनावरांसाठी चारा घेऊन जात असतांना धावत्या पिकअपने पेट घेतल्याची घटना येवला- अंदरसुल रोडवर घडली. ड्रायव्हरने वेळीच गाडी थांबवून बाहेर पडल्याने त्याचा जीव वाचला. हेही वाचा -अक्षय कुमार लॉकडाऊनमध्ये करतोय आगामी सिनेमाची तयारी, असं सुरू आहे काम पिकअपने पेट घेतल्याची माहिती मिळताच येवल्याच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली. मात्र, तो पर्यंत चारा आणि पिकअप पूर्णपणे जळाले होते. वायरिंगच्या शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
Published by:sachin Salve
First published: