जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / अक्षय कुमार लॉकडाऊनमध्ये करतोय आगामी सिनेमाची तयारी, असं सुरू आहे काम

अक्षय कुमार लॉकडाऊनमध्ये करतोय आगामी सिनेमाची तयारी, असं सुरू आहे काम

अक्षय कुमार लॉकडाऊनमध्ये करतोय आगामी सिनेमाची तयारी, असं सुरू आहे काम

काही दिवसांपूर्वी लॉकडाऊनमध्येच एका जाहिरातीचं शूटिंग केल्यानं अभिनेता अक्षय कुमार खूप चर्चेत आला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 27 मे : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार मागच्या काही दिवसांपासून खूप चर्चेत आला आहे. लॉकडाऊन सुरू असतानाच अक्षय एका जाहिरातीचं शूटिंग पूर्ण केलं. अर्थात हे सर्व सोशल डिस्टंसिंगचे नियम पाळून करण्यात आलं. अशात आता अक्षयनं त्याच्या आगामी सिनेमाच्या कामाला सुद्धा सुरुवात केल्याची सुद्धा माहिती मिळत आहेत. अक्षयचा आगामी सिनेमा बेलबॉटमचे निर्माता निखिल अडवाणी अक्षयसोबत या सिनेमाच्या कामाला ऑनलाइन सुरुवात केली आहे. निर्माता निखिल अडवाणी यांनी अक्षय कुमारला सिनेमाची पटकथा ऑनलाइन ऐकवली. निखिल अडवाणी यांनी सकाळी सहा वाजल्यापासून अक्षय कुमारसोबत व्हिडीओ कॉन्फरन्स घेतली. याबाबतची माहिती त्यांनी सोशल मीडियावरून दिली. त्यांनी लिहिलं, लॉकडाऊनमध्ये अक्षय कुमारसाठी कोणतीच गोष्ट बदललेली नाही. सकाळी सहा वाजता आम्ही बेल बॉटमच्या पटकथेवर चर्चा केली.

जाहिरात

या व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये दिग्दर्शक रंजीत तिवारी, लेखक असीम अरोरा, निर्माता निखील अडवाणी, जॅकी आणि वाशू भगनानी हे सुद्धा सामील झाले होते. हा सिनेमा 22 जानेवारी 2021 ला रिलीज होण्याची शक्यता आहे. सध्या कोरोना व्हायरसमुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे सर्व सिनेमांचं शूटिंग थांबवण्यात आलं आहे. या आधी अक्षय कुमारनं आणि दिग्दर्शक आर बाल्की यांनी सोमवरी कमालिस्तान स्टूडिओमध्ये ‘लॉकडाऊननंतरच्या जबाबदाऱ्या’ या विषयावर एका जाहिरातीचं शूटिंग केलं. अर्थात यासाठी सरकारनं सांगितलेल्या सोशल डिस्टंसिंगच्या नियमांचं पालन करण्यात आलं होतं. ही जाहिरात आरोग्य मंत्रालयासाठी करण्यात आली आहे. ‘भाग्यश्रीला पकड आणि KISS कर…’ फोटोग्राफरनं सलमानला सांगितलं, पण… भाजप आमदारानं केली विराट-अनुष्काच्या घटस्फोटाची मागणी, ‘पाताललोक’वरून नवा वाद

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात