जाहिरात
मराठी बातम्या / बातम्या / क्वारंटाइन असलेल्या इंडियन ऑयलच्या अधिकाऱ्याचा घरात आढळला मृतदेह

क्वारंटाइन असलेल्या इंडियन ऑयलच्या अधिकाऱ्याचा घरात आढळला मृतदेह

क्वारंटाइन असलेल्या  इंडियन ऑयलच्या अधिकाऱ्याचा घरात आढळला मृतदेह

जालिंदर कालेकर हे इंडियन ऑयल कंपनीच्या अधिकारी निवासात 11 जूनपासून एकटेच राहत होते.

  • -MIN READ
  • Last Updated :

मनमाड, 17 जून : सुट्टी संपवून कामावर रुजू होण्यासाठी आलेल्या  इंडियन ऑयल कंपनीच्या अधिकाऱ्याचा निवासस्थानात मृतदेह आढळून आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. जालिंदर कालेकर असं या अधिकाऱ्याचं नाव असून ते अधिकारी निवासात होम क्वारंटाइन म्हणून राहत होते. कोरोना व्हायरसने महाराष्ट्रात थैमान घातले आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी दुसऱ्या जिल्ह्यातून आलेल्या व्यक्तीला क्वारंटाइन करण्यात येते.  जालिंदर कालेकर (वय 58) हे इंडियन ऑईल कॉप्रोरेशनच्यापानेवाडी प्रकल्पात टर्मिनल मॅनेजर पदावर कार्यरत होते. जालिंदर कालेकर हे गेली काही दिवस सुट्टीवर होते. सुट्टीवर असताना ते आपल्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी मुंबईला गेले होते. कालेकर हे मुळचे पुण्याचे रहिवासी होते. त्यांचे कुटुंब हे सध्या मुंबईत राहत आहे.  मुंबईतून ते 11 जून रोजी मनमाडमध्ये परतले होते.   त्यामुळे जालिंदर कालेकर यांना होम क्वारंटाइन राहण्याचा सल्ला देण्यात आला होता. VIDEO: रेल्वे रुळावर अडकलेल्या कारला मालगाडीची जोरदार धडक, कारमध्ये होती युवती त्यानुसार, ते इंडियन ऑयल कंपनीच्या अधिकारी निवासात 11 जूनपासून एकटेच राहत होते. परंतु, आज सकाळी त्यांचा  मृतदेह आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून कालेकर यांचा मृतदेह ताब्यात घेतला असून शवविच्छेदनासाठी  मनमाडच्या उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आला आहे. मॉर्निंग वॉकसाठी दोघे बाहेर पडले ते परत आलेच नाही, यावलमध्ये धक्कादायक घटना कालेकर आधी इंडियन ऑईलच्या गॅस प्रकल्पात कार्यरत होते. त्यानंतर त्यांची बदली ही इंधन प्रकल्पात करण्यात आली होती.  पोलिसांनी कालेकर राहत असलेल्या निवासस्थानाची तपासणी केली असून कालेकर यांचा मृत्यू कशामुळे झाला याचा पोलीस तपास करत आहे. संपादन - सचिन साळवे

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात