नाशिक, 17 जून: रेल्वे रुळावर अडकलेल्या कारला भरधाव मालगाडीनं जोरदार धडक दिली. यात कार चक्काचूर झाली आहे. सुदैवानं या भीषण अपघातात जीवितहानी झाली नाही. या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे.
हेही वाचा...मॉर्निंग वॉकसाठी दोघे बाहेर पडले ते परत आलेच नाही, यावलमध्ये धक्कादायक घटना
मिळालेली माहिती अशी की, नाशिक रोड परिसरात सौभाग्य नगर येथे मंगळवारी सायंकाळी ही घटना घडली. वाहन शिकत असताना युवतीचा वाहनावरील ताबा सुटला आणि कार थेट रेल्वे रुळावर अडकली.
कार शिकत असताना हा प्रकार झाल्याचे प्रथनदर्शनी दिसून येत असल्याची माहिती मिळाली आहे. युवती कारमध्ये एकटीच होती. तिच्यासोबत आणखी कोणी होतं का? याची माहिती पोलिस घेत आहेत.
या घटनेबाबत माहिती मिळताच नाशिक रोड पोलिस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांना घटनेचा पंचनामा केला आहे. सौभाग्य नगर परिसरात ही घटना घडली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.