मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

धक्कादायक! कारमध्ये तरुणीवर अत्याचार करून विवस्त्र अवस्थेत रस्त्यावर सोडलं

धक्कादायक! कारमध्ये तरुणीवर अत्याचार करून विवस्त्र अवस्थेत रस्त्यावर सोडलं

लॉकडाऊनच्या काळात कारमध्ये एका तरुणीवर बलात्कार झाल्याच्या घटनेनं नगर शहर हादरलं आहे.

लॉकडाऊनच्या काळात कारमध्ये एका तरुणीवर बलात्कार झाल्याच्या घटनेनं नगर शहर हादरलं आहे.

लॉकडाऊनच्या काळात कारमध्ये एका तरुणीवर बलात्कार झाल्याच्या घटनेनं नगर शहर हादरलं आहे.

अहमदनगर, 22 जुलै: लॉकडाऊनच्या काळात कारमध्ये एका तरुणीवर बलात्कार झाल्याच्या घटनेनं नगर शहर हादरलं आहे. धक्कादायक म्हणजे बलात्कार पीडित तरुणीला विवस्त्र अवस्थेत भररस्त्यावर सोडून नराधम पसार झाले आहेत.

मिळालेली माहिती अशी की, नगर शहरातील कल्याण रोडवरील रेल्वे पुलाजवळ एका तरुणीवर कारमध्ये लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. पीडित तरुणी विवस्त्र अवस्थेत आढळून आली.

हेही वाचा...प्रकल्प अधिकाऱ्यानं अंगणवाडी महिलांच्या ग्रुपवर पोस्ट केला स्वतःचा न्यूड फोटो

पीडित तरुणी ही मूळची वर्धा जिल्ह्यातील असून तिच्यावर शिंगवे नाईक येथील माऊली सेवा प्रतिष्ठान या सेवाभावी संस्थेत उपचार सुरू आहेत.

माऊली सेवा प्रतिष्ठानच्या डॉ. सुचिता धामणे यांनी दिलेल्या तक्रारीवरून या प्रकरणी तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये अत्याचार करणाऱ्याविरोधात मंगळवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत पीडितेनं दिलेल्या जबाबावरून पोलिसांनी आरोपी अभय बाबूराव कडू (रा.आनंदनगर, सिंहगड रोड, पुणे) या आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत.

पीडित तरुणी मनोरुग्ण...

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, अत्याचार झालेली तरुणी मुळची वर्धा जिल्ह्यातील असून ती मनोरुग्ण आहे. ती वर्धा येथून पळून आली होती. तिचा संपर्क अभय कडू याच्याशी आला. कडू याने त्याच्या वाहनामध्ये बसून युवतीला पुणे येथे नेले.

यानंतर तो तिला घेऊन पुणे येथून नगरमध्ये सोमवारी पहाटे दाखल झाला. कल्याण रोडवरील रेल्वे ब्रीजजवळ कडू याने पीडितेवर कारमध्ये अत्याचार केला.

धक्कादायक म्हणजे या पीडितेला विवस्त्र अवस्थेत रस्त्यावरच सोडून तो पसार झाला. सोमवारी सकाळी नगर शहरातील चांदणी चौक येथे एक तरुणी विवस्त्र अवस्थेत धावत असल्याचे काही लोकांच्या निदर्शनास आले.

हेही वाचा...दरवाढ आंदोलनाला गालबोट, दूध उत्पादक शेतकऱ्यानं विष प्राशन करून संपवलं जीवन

याबाबतची माहिती त्यांनी माऊली सेवा प्रतिष्ठान या सेवाभावी संस्थेला दिली. संस्थेच्या डॉ. सुचिता धामणे यांनी या तरुणीला एका रुग्णवाहिकेतून आपल्या संस्थेत नेले. नंतर याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली.

First published:

Tags: Ahmednagar