मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

महाराष्ट्रात 'या' जिल्ह्यातून सुरू झाली विमानसेवा, असा असेल प्रवासाचा मार्ग

महाराष्ट्रात 'या' जिल्ह्यातून सुरू झाली विमानसेवा, असा असेल प्रवासाचा मार्ग

एअर अलायन्स आणि इंडिगोची विमानसेवा पुरवली जाणार असून प्रवाशांसाठी ऑनलाइन बुकिंगदेखील सुरू झालं आहे.

एअर अलायन्स आणि इंडिगोची विमानसेवा पुरवली जाणार असून प्रवाशांसाठी ऑनलाइन बुकिंगदेखील सुरू झालं आहे.

एअर अलायन्स आणि इंडिगोची विमानसेवा पुरवली जाणार असून प्रवाशांसाठी ऑनलाइन बुकिंगदेखील सुरू झालं आहे.

कोल्हापूर, 23 मे : देशामध्ये 25 मे म्हणजेच सोमवारपासून देशांतर्गत विमानसेवा सुरू करण्यास परवाणगी मिळाल्यानंतर आता सोमवारपासून कोल्हापूरमधून विमानसेवा सुरू होणार आहे. गेल्या 2 महिन्यांपासून विमानसेवा पूर्णपणे ठप्प आहे. परदेशात जाणारी विमानं त्याचबरोबर देशांतर्गत विमानांनी देखील लॉकडाऊनच्या या काळात आकाशात भरारी घेतलेली नाही. या दरम्यान सरकारच्या वंदे भारत मिशनअंतर्गत परदेशामध्ये फसलेल्या भारतीयांना देशात परत आणण्याचं काम सुरू होतं. पण आता पुन्हा एकदा विमान प्रवास सुरू होणार असल्यामुळे याचा अर्थव्यवस्थेलाही फायदा होईल.

विमानसेवा सुरू करण्याच्या सर्व नियमांचं पालन करत कोल्हापूर विमानतळ हे आता उड्डाणासाठी सज्ज झालं आहे. आवश्यकत्या सर्व बाबींची व्यवस्था विमानतळावर करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एअर अलायन्स आणि इंडिगोची विमानसेवा पुरवली जाणार असून प्रवाशांसाठी ऑनलाइन बुकिंगदेखील सुरू झालं आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही विमानसेवा फक्त हैद्राबाद, तिरूपती आणि बंगळुरूपर्यंतच मर्यादीत आहे. कोल्हापूरहून कोणतंही विमान मुंबई येणार नसल्याची माहिती देण्यात आली आहे.

कोरोनाचा गेल्या 24 तासांत हाहाकार, पहिल्यांदाच एका दिवसात वाढले एवढे रुग्ण

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, इंडिगोची विमानसेवा सोमवार, बुधवार, शुक्रवार आणि रविवार याच दिवशी मिळेल. ही विमानसेवा हैद्राबाद-कोल्हापूर-तिरूपती आणि तिरुपती-कोल्हापूर-हैद्राबाद अशी असणार आहे. तर एअर अलायन्सचे सेवा आठवडाभर देण्यात येणार असून हैद्राबाद-कोल्हापूर-बंगळूरु आणि बंगळूरु-कोल्हापूर-हैद्राबाद असा हवाई मार्ग असणार आहे.

त्यामुळे देशांतर्गत विमानसेवा सुरू झाली असली ती आर्थिक राजधानी मुंबईशी कोणतीही विमानसेवा कनेक्ट होणार नसल्याचं स्पष्ट आहे. दरम्यान, या विमानसेवेचा आयटी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. विमान प्रवास करताना काही महत्त्वाच्या नियमांचे पालन करणे आवश्यक राहील.

सर्व प्रवाशांना एसओपीचे पालन करणे अनिवार्य असेल. यातील महत्त्वाचा नियम म्हणजे प्रवास करताना तुमच्या फोनमध्ये आरोग्य सेतू अॅप असणे अत्यंत आवश्यक आहे. 14 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी आरोग्यसेतू आवश्यक नाही आहे. याशिवाय काही महत्त्वाच्या नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत. प्रवासादरम्यान मिळणार खाद्यपदार्थ कोव्हिड संदर्भातील खबदारी घेऊनच देण्यात येतील.

3 कोटी भारतीयांची खासगी माहिती धोक्यात; पत्ता, ईमेल, फोन नंबर झाले लीक

एएआयने दिलेल्या माहितीनुसार विमानतळ संचालकांना प्रवासी टर्मिनलमध्ये येण्याआधीपासूनच योग्य प्रबंध आखणे गरजेचे आहे. तसच प्रवाशांनी विमानतळामध्ये जाण्याआधी थर्मल स्क्रिनिंग आवश्यक आहे. विमानतळाच्या संचालकांना प्रवाशांच्या सामानाच्या सॅनिटायझेशनसाठी देखील व्यवस्था करावी लागेल. AAI देशभरातील 100 हून अधिक विमानतळांचे व्यवस्थापन पाहते. दिल्ली, मुंबई, बेंगळुरू आणि हैदराबाद सारख्या मोठ्या विमानतळांचे व्यवस्थापन खाजगी कंपन्या पाहतात.

ग्राहकांना SBI चा इशारा! दुर्लक्ष केल्यास एक SMS करेल तुमचं बँक खातं रिकामं

संपादन- रेणुका धायबर

First published:

Tags: Corona