मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

कोरोनाचा गेल्या 24 तासांत हाहाकार, पहिल्यांदाच एका दिवसात वाढले एवढे रुग्ण

कोरोनाचा गेल्या 24 तासांत हाहाकार, पहिल्यांदाच एका दिवसात वाढले एवढे रुग्ण

देशातील कोरोना विषाणूमुळे आतापर्यंत 3,720 लोकांचा मृत्यू झाला आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या आकडीवारीनुसार देशात 69,597 पॉझिटिव्ह रूग्ण आहेत तर 51,783 रुग्ण बरे झाले आहेत.

देशातील कोरोना विषाणूमुळे आतापर्यंत 3,720 लोकांचा मृत्यू झाला आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या आकडीवारीनुसार देशात 69,597 पॉझिटिव्ह रूग्ण आहेत तर 51,783 रुग्ण बरे झाले आहेत.

देशातील कोरोना विषाणूमुळे आतापर्यंत 3,720 लोकांचा मृत्यू झाला आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या आकडीवारीनुसार देशात 69,597 पॉझिटिव्ह रूग्ण आहेत तर 51,783 रुग्ण बरे झाले आहेत.

  • Published by:  Manoj Khandekar

नवी दिल्ली, 23 मे : भारतात (India)कोरोनाव्हायरसच्या (Coronavirus)नवीन घटनांनी आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड तोडले. आरोग्य मंत्रालयाच्या (Ministry of Health) आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत कोरोनाचे 6654 नवीन रुग्ण आढळले आहेत. नवीन कोरोना प्रकरणं समोर येताच, कोरोनामध्ये संक्रमित रूग्णांची संख्या देशात 1,25,101 झाली आहे. शुक्रवारी कोव्हिड-19 मुळे 137 लोकांचा मृत्यू झाला आहे. देशातील कोरोना विषाणूमुळे आतापर्यंत 3,720 लोकांचा मृत्यू झाला आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या आकडीवारीनुसार देशात 69,597 पॉझिटिव्ह रूग्ण आहेत तर 51,783 रुग्ण बरे झाले आहेत.

शुक्रवारी कोव्हिड-19 मुळे मृत झालेल्या 137 लोकांपैकी महाराष्ट्रात 63, गुजरातमध्ये 29 आणि दिल्लीत 14 लोकांचा मृत्यू झाला. महाराष्ट्रातील एकूण प्रकरणं, 44,582 पर्यंत पोहोचली आहेत, तर तामिळनाडूमध्ये 14,753 प्रकरणं नोंदवली गेली आहेत. हा सलग सहावा दिवस आहे जेव्हा महाराष्ट्रात 2 हजारांहून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे.

तामिळनाडूमध्ये 786 लोकांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. त्यानंतर राज्यात एकूण संसर्ग होण्याचं प्रमाण 14,753 गेलं आहे. शुक्रवारी आणखी चार जणांचा मृत्यू झाल्याचं आरोग्य विभागानं सांगितलं आहे. विभागानं म्हटले आहे की, यासह राज्यातील कोव्हिड-19 मधील मृतांची संख्या 98 वर गेली आहे.

धक्कादायक! कोरोना स्क्रिनिंगच्या नावाखाली विवाहित महिलेवर सामूहिक बलात्कार

बिहारमध्येही संख्या वाढून 2,177वर

बिहारहून दिल्लीला पोहोचल्यानंतर काही तासांनंतर मजूराची कोरोना विषाणूमुळे मृत्यू झाल्याची घटना राज्याच्या आरोग्य विभागानं नोंदवली आहे. स्थलांतरित कामगार तीन दिवसांपूर्वीच त्यांच्या मूळ राज्यात परत आले होते. राज्याचं आरोग्य विभाग म्हणालं की, संसर्गाचे 195 नवीन रुग्ण आढळले आहेत आणि त्यामुळे संक्रमित लोकांची संख्या 2177 झाली आहे. आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, मृतक खगडिया जिल्ह्यातील असून मंगळवारी ते एका विशेष ट्रेनने आले होते.

ओडिशामध्ये कोव्हिड-19चा आणखी 86 लोकांना संसर्ग झाल्यानंतर संसर्ग होण्याचे प्रमाण राज्यात 1,189 पर्यंत वाढलं आहे. आरोग्य विभागानं शुक्रवारी दिलेल्या माहितीनुसार, यातील 86 प्रकरणे राज्यातील विविध भागांतील स्वतंत्र केंद्रांमधून समोर आली आहेत. नव्याने संक्रमित लोक महाराष्ट्रात, गुजरात, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, छत्तीसगड, हरियाणा, तेलंगणा येथून परत आले आहेत. त्याचबरोबर युएईहून परत आलेल्या चार जणांनाही संसर्ग झाल्याचं आढळलं आहे.

3 कोटी भारतीयांची खासगी माहिती धोक्यात; पत्ता, ईमेल, फोन नंबर झाले लीक

झारखंडमध्ये 18 नवीन प्रकरणं

झारखंडमध्ये परत गेलेल्या परप्रांतीय कामगारांमुळे वाढणार्‍या कोरोना संक्रमणाची प्रक्रियाही सुरूच आहे. एकूण 18 नवीन लोकांमध्ये या संसर्गाची पुष्टी झाली आहे. ज्यामुळे राज्यात संक्रमित लोकांची संख्या 308 इतकी आहे. शुक्रवारी उत्तर प्रदेशात कोव्हिड-19 संसर्गामुळे आणखी 14 रुग्णांचा मृत्यू झाला तर एकूण मृतांचा आकडा152 झाला आहे, तर 220 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. आरोग्य विभागाने सायंकाळी उशिरा जाहीर केलेल्या बुलेटिननुसार, राज्यात कोरोना संक्रमणाची एकूण 5735 प्रकरणे आहेत, त्यापैकी 2259 सक्रिय संसर्गाची प्रकरणे आहेत आणि 3324 रुग्ण निरोगी व रुग्णालयातून डिस्चार्ज आहेत.

संपादन - रेणुका धायबर

First published:

Tags: Corona