Home /News /news /

कोरोनाला हद्दपार करण्यासाठी ठाणे महापालिकेने तयार केला ACTION PLAN

कोरोनाला हद्दपार करण्यासाठी ठाणे महापालिकेने तयार केला ACTION PLAN

झोपटपट्टी व दाटलोक वस्ती परिसरातील अनेक नागरिक नियमांचे उल्लंघन करून विनाकारण रस्त्यावर फिरत आहेत

ठाणे, 7 मे: मुंबईसह ठाणे शहरात कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्यानं वाढ होत आहे. ठाणे महापालिका क्षेत्रात संचारबंदीच्या काळात झोपटपट्टी व दाटलोक वस्ती परिसरातील अनेक नागरिक नियमांचे उल्लंघन करत असल्याचं समोर आलं आहे. विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या नागरिकांना आळा घालून कोरोना कोव्हीड 19 चा संसर्ग वाढू नये यासाठीच्या ठाणे महापालिकेने अॅक्शन प्लान तयार केला आहे. महापालिका आयुक्त विजय सिंघल यांच्या संकल्पनेतून 'ठाणे कोव्हीड 19 योद्धा' नावाने तरूण स्वयंसेवकांची नवीन फळी तयार करण्यात आली आहे. राज्यात कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी ठाणे महापालिकेच्यावतीने विविध अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहेत. याच उपक्रमाचा भाग म्हणून 'ठाणे कोव्हीड 19 योद्धा'ची नियुक्ती करण्यात आली आहे. हेही वाचा.. कोरोना योद्धांना सॅल्युट! एक वर्षाच्या चिमुरड्याला खेचून आणलं मृत्यूच्या दारातून शहरातील झोपटपट्टी व दाटलोक वस्ती परिसरातील अनेक नागरिक नियमांचे उल्लंघन करून विनाकारण रस्त्यावर फिरत आहेत, त्यास आळा घालण्यासाठी तसेच संचारबंदीचे योग्य पालन व्हावे आणि कोरोनाचा प्रादूर्भाव वाढू नये यासाठी प्रभाग समिती निहाय स्थानिक लोकप्रतिनिधीच्या आणि नगरसेवकांच्या सहकार्याने हे स्वयंसेवक ठाणे कोव्हीड 19 योद्धा म्हणून काम करणार आहेत. सध्या वागळे प्रभाग समिती व लोकमान्य नगर प्रभाग समितीमध्ये हे योद्धा कार्यरत आहेत. ठाणे महापालिकेच्यावतीने 'ठाणे कोव्हीड 19 योद्धा' या नावाने 'घरातच रहा कोरोनाला हरवा' असा संदेश देणारे विशेष जॅकेट परिधान केलेले हे योद्धा शहरातील झोपटपट्टी व दाटलोक वस्ती परिसरात काम करीत आहेत. हेही वाचा..धक्कादायक! कोरोनावर लस शोधण्याआधीच चिनी प्राध्यपकाची गोळ्या झाडून हत्या विविध कारणे सांगून रस्त्यावर फिरणारे नागरिक, मैदानावर खेळण्यासाठी एकत्र येणारे तरुण, चौका चौकात एकत्र येणारे नागरिक या सर्वांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, गर्दी करू नये, संचारबंदीचे पालन करावे, सोशल डिस्टसिंगचे नियम पाळावे आदी गोष्टी बाबत हे योद्धा नागरिकांना मार्गदर्शन करणार आहेत.
Published by:Sandip Parolekar
First published:

Tags: Corona, Coronavirus, Thane, Thane news

पुढील बातम्या