वाचा-...तर येत्या काही वर्षात कोट्यवधी भारतीयांचा उष्णतेमुळे होणार मृत्यू रशियामध्येही दोन डॉक्टरांचा मृत्यू, एक जखमी रशियातील रुग्णालयाच्या खिडकीमधून पडून दोन डॉक्टरांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनं साऱ्या जगाला हादरून सोडलं आहे. यातील एक डॉक्टराची प्रकृती गंभीर आहे. मीडिया रिपोर्टनुसार, तिन्ही डॉक्टरांना कोरोना व्हायरस संदर्भात गोपनिय माहिती मिळाली होती. तसेच, या तिघांनी सुरक्षा उपकरणांची कमतरता याबाबत सरकारला सवाल केला होता. गेल्या आठवड्यांत, संपूर्ण रशियामधील वैद्यकीय कर्मचार्यांनी संसर्ग नियंत्रण प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित केले आणि संरक्षणात्मक उपकरणांच्या अभावाचा प्रश्न उपस्थित केला होता. ज्यामुळे डझनभर रुग्णालयातील विषाणूंच्या संसर्गावर परिणाम झाला. अनेक डॉक्टरांनी तक्रार दिल्यानंतर त्यांना नोकरीवरून काढून टाकण्याची धमकी दिल्याचेही म्हटले आहे. सध्या पोलीस या तीन डॉक्टरांनी आत्महत्या केली की त्यांचा खून करण्यात आला, याचा तपास करत आहेत.Shot to death. A medical researcher on the "verge of making very significant" coronavirus findings was found shot to death over the weekend in Pennsylvania, officials said. Bing Liu, 37, was a researcher at University of Pittsburgh School of Medicine. https://t.co/HoItSy2ZsR pic.twitter.com/AgL2NgYNTX
— Shomari Stone (@shomaristone) May 6, 2020
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona