मुंबई, 18 एप्रिल : महाराष्ट्रापुढे कोरोना नावाच्या व्हायरसचे महासंकट उभे ठाकले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून देशभरात 3 मेपर्यंत लॉकडाउन करण्यात आला आहे. या लॉकडाउनमुळे बांधकाम मजुरांवर उपासमारीची वेळी आहे. त्यामुळे राज्य सरकारने नोंदीत सक्रीय बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातील कामगारांना 2000 रुपये एवढे आर्थिक सहाय्य कामगारांना देण्याचा निर्णय घेतला आहे.
कोरोना या विषाणूच्या प्रादुर्भावामुळे उद्भवलेल्या स्थितीत राज्य व केंद्र शासनाकडून लॉकडाउन 3 मे 2020 पर्यंत घोषित करण्यात आलेला आहे. लॉकडाउन कालावधीत राज्यातील इमारत व इतर बांधकामे बंद झाली असल्याने बांधकाम कामगारांना दररोज रोजगार मिळत नाही. त्यामुळे दैनंदिन जीवनातील मूलभूत गरजा भागविण्यासाठी कामगारांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.याच पार्श्वभूमीवर मंडळाकडील नोंदीत सक्रीय बांधकाम कामगारांना 2000 रुपये एवढे आर्थिक सहाय्य थेट बांधकाम कामगाराच्या बँक खात्यात डीबीटी (DBT) पद्धतीने जमा करण्यात येणार आहे. याचा फायदा राज्यातील 12 लाखांपेक्षा अधिक नोंदीत बांधकाम कामगारांना होणार असल्याची माहिती कामगार मंत्री दिलीप वळसे- पाटील यांनी दिली.
हेही वाचा -20 तारखेपासून अतिरिक्त एसटी बसेस सुटणार, ही आहे संपूर्ण यादी!
बांधकाम कामगारांना भेडसावत असलेल्या अडचणीमध्ये कामगारांना आर्थिक साहाय्य देण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार , कामगार मंत्री दिलीप वळसे- पाटील आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या बैठकीत झालेल्या चर्चेनुसार मंडळाकडील नोंदीत सक्रीय बांधकाम कामगारांना 2 हजार रुपये एवढे आर्थिक सहाय्य थेट बांधकाम कामगाराच्या थे बँक खात्यात जमा करण्याचा निर्णय घेण्यात आला.
हेही वाचा - कोरोनामुळे ही मोठी कंपनी 2025पर्यंत वर्क फ्रॉम होम सुरू ठेवण्याच्या विचारात
इमारत व इतर बांधकाम कामगारांना बांधकामाची परवानगी देताना विकाससकाकडून उपकर वसूल करून मंडळाकडे जमा करण्यात येतो. मंडळाकडे जमा उपकर निधीमधून नोंदीत बांधकाम कामगारांकरिता विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येतात.
कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे उद्भवलेल्या स्थितीत नोंदीत बांधकाम कामगारांना प्रत्येकी 2 हजार रूपयेप्रमाणे आर्थिक मदत राज्यातील 12 लाखापेक्षा जास्त बांधकाम कामगारांना देण्यात येत असून सदरचे आर्थिक सहाय्य नोंदीत बांधकाम कामगारांच्या बँक खात्यात जमा करण्यात येत आहे, अशी माहिती दिलीप वळसे-पाटील यांनी दिली.
हेही वाचा - सचिन साळवे
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Maharashtra