कोरोनामुळे ही कंपनी बदलणार कार्यपद्धती, 2025 पर्यंत 75% कर्मचाऱ्यांना घरूनच काम देण्याची शक्यता

भारतातील सगळ्यात मोठी आयटी कंपनी टाटा कन्सल्टंसी सर्व्हिस (TCS-Tata Consultancy Services) 2025 पर्यंत वर्क फ्रॉम होम सुरू ठेवण्याच्या विचारात आहे.

भारतातील सगळ्यात मोठी आयटी कंपनी टाटा कन्सल्टंसी सर्व्हिस (TCS-Tata Consultancy Services) 2025 पर्यंत वर्क फ्रॉम होम सुरू ठेवण्याच्या विचारात आहे.

  • Share this:
    नवी दिल्ली, 18 एप्रिल : कोरोना व्हायरस (Coronavirus)मुळे जगभरात अनेक बदल झाले आहेत. अनेक कंपन्यांचे वर्क फ्रॉम होम सुरू आहे. दरम्यान भारतातील सगळ्यात मोठी आयटी कंपनी टाटा कन्सल्टंसी सर्व्हिस (TCS-Tata Consultancy Services) 2025 पर्यंत वर्क फ्रॉम होम सुरू ठेवण्याच्या विचारात आहे. कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 2025 म्हणजेच पुढील 5 वर्षापर्यंत कंपनी 75 टक्के स्टाफला वर्क फ्रॉम होम देण्याच्या विचारात आहे. म्हणजे केवळ 25 टक्के कर्मचारी कंपनीच्या कार्यालयातून काम पाहतील. (हे वाचा-Lockdown 2.0-देशातील 45 टक्के अर्थव्यवस्था 20 एप्रिलपासून होणार रिस्टार्ट) इकोनॉमिक टाइम्सने दिलेल्या बातमीनुसार टीसीएस हा निर्णय घेण्याच्या विचारात आहे कारण यामुळे कामाची प्रोडक्टिव्हिटी वाढेल आणि कर्मचाऱ्यांचा वेळ वाचेल, अशी अपेक्षा टीसीएसला आहे. सध्या आयटी क्षेत्रामधील सर्व कंपन्यांचे 90 टक्के कर्मचारी घरून काम करत आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात काम सुरू आहे. परिणामी आयटी कंपन्या वर्क फ्रॉम होम मॉडेलवर भविष्यात काम करता यावे यासाठी विचाराधीन आहेत. TCS मध्ये सध्या साडेचार लाख कर्मचारी काम करत आहेत. यापैकी 93 टक्के कर्मचारी घरूनच काम करत आहेत. यावेळी त्यांची सेवा जागतिक स्तरावर देखील सुरू आहे. कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार कंपनीकडून या बाबी लक्षात घेऊन भविष्यात इन्फ्रास्ट्रक्चर तयार करण्यात येणार आहे. (हे वाचा-वायदे बाजारात सोन्याचांदीमध्ये मोठी घसरण, मौल्यवान धातूंची झळाळी उतरली) भारतीय सॉफ्टवेअर लॉबी असणारी नेस्कॉम सुद्धा हे मानत आहे की कोव्हिड 19 मुळे जगभरातील आयटी कंपन्यांना वर्क फ्रॉम होम संकल्पनेवर विचार करण्यास भाग पाडले आहे. अशी संकल्पना सुरू झाल्यास आयटी कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कोणत्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम द्यायचे आणि कोणाला कंपनी ऑफिसमध्ये बोलवायचे हा निर्णय कंपनीचा राहील. या दोन्हीमध्ये संतुलन राखणे आवश्यक आहे. संपादन - जान्हवी भाटकर
    First published: