Home /News /mumbai /

20 तारखेपासून अतिरिक्त एसटी बसेस सुटणार, ही आहे संपूर्ण यादी!

20 तारखेपासून अतिरिक्त एसटी बसेस सुटणार, ही आहे संपूर्ण यादी!

राज्य शासकीय कार्यालयांमध्ये 10 टक्के अधिकारी-कर्मचाऱ्यांची उपस्थिती अनिवार्य करण्यात आली असून त्यांना मंत्रालयात येण्या-जाण्यासाठी एस.टी. आणि बेस्टच्या विशेष बस सुविधा देण्याचा निर्णय या अधिसूचनेद्वारे घेण्यात आला आहे.

    मुंबई, 18 एप्रिल : महाराष्ट्राला कोरोना व्हायरसचा विळखा बसला आहे. कोरोनातून आर्थिक घडी दूर करण्यासाठी राज्य सरकारने 20 एप्रिलपासून संचारबंदीच्या अटींमध्ये काही बदल केले आहे. त्यामुळे राज्यातील काही भागांमध्ये उद्योग व्यवसाय सुरू होणार आहे. मुंबईतही एसटी वाहतूक व्यवस्था सुरू करण्यात येणार आहे. राज्य शासनाने आज लॉकडाऊनसंदर्भात नवी सर्वसमावेशक अधिसूचना जारी केली असून यात अतिरिक्त औद्योगिक घटकांसह शेतीविषयक बाबी, बांधकाम क्षेत्र आदींना अधिक सूट देण्यात आली आहे. ऑनलाईन आणि दूरस्थ शिक्षणाला प्रोत्साहन देण्यात आले असून ‘सोशल डिस्टन्सिंग’च्या नियमांचे पालन करून मनरेगा अंतर्गत कामे करण्याचा समावेश या अधिसूचनेत करण्यात आला आहे. राज्य शासकीय कार्यालयांमध्ये 10 टक्के अधिकारी-कर्मचाऱ्यांची उपस्थिती अनिवार्य करण्यात आली असून त्यांना मंत्रालयात येण्या-जाण्यासाठी एस.टी. आणि बेस्टच्या विशेष बस सुविधा देण्याचा निर्णय या अधिसूचनेद्वारे घेण्यात आला आहे. हेही वाचा - पुण्यात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ, प्रत्येक तासाला कोरोनाचे 3 नवे रुग्ण सोमवारपासून मुंबईत मंत्रालय ते विविध भागात एसटी बसेसची सेवा सुरू करण्यात येणार आहे. यासाठी एसटी महामंडळातील 30 कर्मचारी कामासाठी हजर असणार आहे. तसंच शहरातील इतर भागातही बसेस सुरू करण्यात येणार आहे. सुमारे 22 बसेसच्या सुमारे 100 फेऱ्या वाढवण्यात येणार आहे. सध्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी एसटीची वाहतूक सुरू आहे. आता राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना मंत्रालयात ने आण करण्यासाठी वाहतूक सुरू करण्यात येणार आहे. याचे वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. असं आहे एसटी बसेसचं वेळापत्रक मुंबई विभाग     पनवेल - मंत्रालय - 6     मंत्रालय - पनवेल - 6 ठाणे विभागासाठी यादी     आसनगाव -मंत्रालय - 2     मंत्रालय - आसनगांव - 2     बदलापूर - मंत्रालय - 5     मंत्रालय - बदलापूर - 5     डोंबिवली - मंत्रालय - 5     मंत्रालय - डोंबिवली - 5     कल्याण - मंत्रालय - 5     मंत्रालय - कल्याण - 5     शहापूर - मंत्रालय - 3     मंत्रालय - शहापूर - 3     मिरारोड - मंत्रालय - 3     मंत्रालय - मिरारोड - 3 हेही वाचा - वार्षिक 27 हजार जमा करून मिळतील 10 लाख, जाणून घ्या LIC ची बेस्ट पॉलिसी पालघर विभागातून सुटणाऱ्या गाड्या     विरार - मंत्रालय - 5     मंत्रालय- विरार - 5     पालघर - मंत्रालय - 5     मंत्रालय - पालघर - 5     वसई - मंत्रालय - 5     मंत्रालय - वसई - 5     नालासोपारा - मंत्रालय - 5     मंत्रालय - नालासोपारा -  5 संपादन - सचिन साळवे
    Published by:sachin Salve
    First published:

    Tags: Mumbai, St bus

    पुढील बातम्या