अनिस शेख, प्रतिनिधी मावळ, 05 मे : कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून नागरिकांनी घरीच राहावे, असं आवाहन सरकारकडून वारंवार केलं जातं. परंतु, मावळमध्ये भाजी खरेदीसाठी बाहेर पडणे एका 40 वर्षीय व्यक्तीला जीवावर बेतले आहे. मधमाशांनी चावा घेतल्यामुळे या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. मावळ तालुक्यातील देहूरोड शहरात ही धक्कादायक घटना घडली आहे. ईरन्ना शेट्टी असं मृत्युमुखी झालेल्या व्यक्तीचं नाव आहे.ईरन्ना शेट्टी हे भाजी खरेदीसाठी घरातून बाहेर पडले होते. देहूरोड शहरातील थॉमस बाजार या बिल्डिंगजवळ ते उभे होते. तेव्हा या बिल्डिंगमध्ये असलेल्या मधमाशांचा पोळ अचानक तुटून खाली पडला. पोळ जसा तुटून खाली पडला त्यानंतर माशांनी दिसेल त्या व्यक्तीवर हल्ला केला. रस्त्याने येणारे -जाणाऱ्या लोकांना मधमाशांनी चावा घेतला. त्यामुळे एकच गोंधळ उडाला होता. अनेक जण आपला जीव वाचवत पळत सुटले होते. हेही वाचा - आई काय करते? अपंग मातेनं दुचाकीवर 1200 किमी प्रवास करून लेकराला आणलं घरी! पंरतु, मधमाशांच्या या हल्ल्यात ईरन्ना शेट्टी सापडले गेले. त्यांना मोठया प्रमाणात माशांनी चावा घेतली. त्यामुळे ते जागेवर बेशुद्ध पडले होते.थोड्यावेळानंतर स्थानिक लोकांनी त्यांना नजीकच्या रुग्नालयात दाखल केले. परंतु, शेट्टी यांना मधमाशा चावल्याने मानसिक धक्का बसला होता. त्यामुळे त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं आहे. मधमाशांच्या हल्ल्यात शेट्टी यांचा दुर्दैर्वी मृत्यू झाल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. तर शेट्टी कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे. संपादन - सचिन साळवे
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.