Home /News /news /

आई काय करते? अपंग मातेनं दुचाकीवर 1200 किमी प्रवास करून लेकराला आणलं घरी!

आई काय करते? अपंग मातेनं दुचाकीवर 1200 किमी प्रवास करून लेकराला आणलं घरी!

सोनूताईंनी पिंपरी चिंचवड ते अमरावती दरम्यान केलेला हा प्रवास आपल्याला थक्क करून सोडणार आहे.

पिंपरी-चिंचवड, 05 मे : कोरोना व्हायरसमुळे देशभरात लॉकडाउन करण्यात आलं. त्यामुळे अडकलेले लाखो मजूर एका राज्यातून दुसऱ्या राज्यात हजारो किलोमीटर पायपीट करत गावी पोहोचले.  पण, गावाकडे अडकलेल्या मुलाला परत आणण्यासाठी एका अपंग मातेनं चक्क दुचाकीवरून तब्बल 1200 किलोमीटरचा प्रवास केला. लॉकडाऊनच्या काळात घडलेला या जिद्दीच्या प्रवासाची कहाणी जगाला विसरता येणार नाही अशीच आहे. "कुशीत रडणारा मुलगा...आई मी तुझे सगळे स्वप्न पूर्ण करेल" असं म्हणत आईच्या कुशीत ऑक्साबोक्शी रडणाऱ्या या भाग्यवान मुलांचं नाव आहे प्रतीक खंदारे. भाग्यवान यासाठी की, त्याला ह्या सोनूताईंसारखी आई लाभली जिने आपल्या जीवाची परवा न करता लॉकडाउनच्या या काळात गावकडून परत आणलं तेही या दुचाकीवरून, रणरणतं ऊन, ओसाड पडलेले रस्ते, किर्रर्र अंधार, घाट माथ्यावरची अवघड वळणे आणि जीवघेणे खड्डे चुकवत ही माता केवळ 24 तासात 600 किलोमीटरच अंतर पार करत आपल्या पोटच्या गोळ्या पर्यंत पोहोचली. हेही वाचा - अखेर तुकाराम मुंढे नरमले, भाजप नेत्यांच्या विरोधामुळे 24 तासात बदलला निर्णय खासगी वाहनांचा खर्च परवडत नव्हता. त्यामुळे  सोनूताई खंदारे यांच्याकडे दुचाकीवरून जाण्याशिवाय पर्यायच उरला नव्हता, त्यामुळेच त्यांना हा धाडसी निर्णय घ्यावा लागला. जन्मतः अपंग असल्याने सोनूताई कुबड्यांच्याच आधार घेऊनच चालतात. मात्र ,त्यांचा जीवनातला खरा आधार आहेत त्यांची  दोन मुलं. ज्यांचं भविष्य घडविण्यासाठी त्या अशा जिवावर उदार होतात. सोनूताईंनी पिंपरी चिंचवड ते अमरावती दरम्यान केलेला हा प्रवास जिथे आपल्याला थक्क करून जातो. तिथे अनंत कष्ट आणि यातना सोसून, आपल्याला घेण्यासाठी आलेल्या आईला बघून प्रतिकला गहिवरून आलं नसतं तरच नवल. अशा धाडसी आईवर त्याला आपला जिव ओवाळण्याची इच्छा झाली असेल. मात्र, आपल्या भविष्यासाठी तिने पाहिलेलं स्वप्न आपण पूर्ण करणार हे वचन देण्यापलीकडे त्याच्याकडे दुसरं काहीही नव्हतं. हेही वाचा -माऊलीला सलाम! लेकीच्या मृत्यूनंतर दोन दिवसांनी देश सेवेसाठी सज्ज झाली ही कोरोना माय लेकराच्या या अनोख्या भेटीचं श्रेय पिंपरी चिंचवड पोलिसांनाही जातं. कारण, अपंग असलेल्या सोनूताईंच्या दैनंदिन जीवनात प्रतिककडून होणाऱ्या मदतीचं महत्त्व त्यांनी ओळखलं आणि विशेष बाब म्हणून त्याला आणण्यासाठीची परवानगी दिली. त्यानुसार, सोनुताईंनी सलग तीन दिवसाचा प्रवास केला आणि आपलं ध्येय गाठत आपल्या मायेपुढे आभाळाही ठेंगण केलं. शारिरीक अपंगत्व, बाहेर उभा असलेला कोरोना नावाचा मृत्यू आणि तब्बल 1200 किलोमीटरच्या प्रवासात पावलो पावली येणाऱ्या अडचणींवर मात करत सोनूताईंनी आपल्या लेकराला घरी परत आणलं. मात्र, त्यांची जिद्द ही केवळ मुलाला घरी आणण्यासाठी नव्हती तर त्यांना आपल्या मुलांचं भविष्यही घडवायचं आहे, अशा जिद्दी मातृत्वाला सलाम करण्या बरोबरच त्यांच स्वप्न पूर्ण करणयासाठी आपण त्यांना मदत करायला हवी. संपादन - सचिन साळवे
Published by:sachin Salve
First published:

Tags: Pimpri chinchwad

पुढील बातम्या